Shukra Ketu Yuti 2025: पुन्हा तेजी येणार! अखेर शुक्र-केतुची युती जुळल्यानं 4 राशींना दुहेरी कमाईचे दिवस
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shukra Ketu Yuti 2025: गेल्या 15 सप्टेंबर रोजी शुक्र ग्रहानं सिंह राशीत प्रवेश केलाय. त्याठिकाणी केतू आधीच उपस्थित आहे. सिंह राशीत शुक्र आणि केतूची युती काही राशींना लाभदायक ठरू शकते. या राशींना त्यांच्या करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सुधारणा दिसून येतील. शुक्र-केतुच्या युतीमुळे कोणत्या राशींना सर्वात शुभ परिणाम मिळतील, जाणून घेऊ.
शुक्र-केतुची युती ज्योतिषशास्त्रातील महत्त्व - ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र-केतुची युती ही एक विशेष ग्रहस्थिती आहे. या युतीचा व्यक्तीच्या जीवनावर आणि स्वभाववर खोलवर परिणाम होतो. शुक्र हा प्रेम, सौंदर्य, आनंद, भौतिक सुख, कला आणि सर्जनशीलता यांचा कारक आहे, तर केतु हा वैराग्य, अध्यात्म, गूढ विद्या, त्याग आणि बंधनातून मुक्तीचा कारक मानला जातो.
advertisement
जेव्हा हे दोन भिन्न स्वभावाचे ग्रह एकत्र येतात, तेव्हा त्यांची ऊर्जा एकमेकांमध्ये मिसळते, ज्यामुळे मिश्रित आणि काही वेळा विरोधाभासी परिणाम दिसून येतात. या युतीमुळे व्यक्तीला कलात्मक गोष्टींमध्ये विशेष रुची निर्माण होते. ही व्यक्ती अध्यात्माकडे आकर्षित होऊ शकते आणि भौतिक सुखांपेक्षा आंतरिक शांतीला अधिक महत्त्व देऊ शकते.
advertisement
मेष - तुमच्या पाचव्या भावात शुक्र आणि केतूची रहस्यमय युती होत आहे. ही युती शैक्षणिक क्षेत्रात, विशेषतः संशोधन करणाऱ्यांसाठी, लाभदायक ठरेल. या काळात परदेशात जाण्याचे तुमचे स्वप्न देखील पूर्ण होऊ शकते. ही युती प्रेमसंबंधांसाठी देखील फायदेशीर ठरेल; तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत लग्न करण्याचा निर्णय घेऊ शकता. तुमचे मनोबल वाढेल, ज्यामुळे तुमच्या करिअरमध्ये फायदा होईल. तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल.
advertisement
advertisement
advertisement
धनु - तुमच्या धर्मगृहात केतू आणि शुक्र यांच्या युतीमुळे धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. या काळात काही लोक संन्यास घेऊ शकतात. या काळात तुम्हाला ज्ञान मिळेल. यासोबतच, तुम्हाला देवी लक्ष्मीचे आशीर्वाद देखील मिळतील, ज्यामुळे तुम्हाला भरपूर संपत्ती आणि समृद्धी मिळेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)