Shaniwar Tips: शनिवारी केस-नखं का कापू नयेत? कोणत्या कामांमुळे शनिदेवाची पडते वक्रदृष्टी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Dev Upay: धार्मिक श्रद्धेनुसार शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. असे मानले जाते की, जो कोणी भक्त शनिवारी विधीपूर्वक शनी पूजा करतो, त्यांना शनिदेवाची कृपा प्राप्त होते. परंतु, मान्यतेनुसार शनिवारी काही कामं करू नये. याचे खूप वाईट परिणाम होऊ शकतात. शनिवारी टाळावी अशी कोणती कामं आहेत, याविषयी तज्ज्ञ ज्योतिषांनी दिलेली माहिती पाहू.
शनिवारी ब्रह्म मुहूर्तावर सकाळी लवकर उठून स्नान करून शनिदेवाची पूजा करावी. शनिवारी उपवास करणे खूप लाभदायी ठरू शकते. जर तुम्ही या दिवशी उपवास करू शकत नसाल तर जेवणात तेलाचा वापर करू नये. या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली जल अर्पण करावे आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यानं शनिदेव प्रसन्न होतात. असे केल्याने शनीची साडेसाती त्रास देत नाही, असे मानले जाते. (इमेज क्रेडिट: कॅनव्हा)
advertisement
प्राण्यांना त्रास नको : तसं कोणत्याच दिवशी वाद, भांडण, मारामारी करू नये. परंतु शनिवारी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. शनिदेवाला प्राण्यांवर ओढ असते, त्यामुळे शनिवारी प्राण्यांना त्रास देऊ नये, अत्याचार करू नयेत, असे मानले जाते. याशिवाय तुमच्यामुळे कोणाचेही मन दुखी न करण्याचा प्रयत्न करा. तसेच या दिवशी कुत्रे, गाय, बकरी आणि पशु-पक्ष्यांना भाकरी खायला द्यावी. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात, असे मानले जाते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
लोखंडी वस्तू घरात आणू नका : असे मानले जाते की शनिवारी चुकूनही लोखंड किंवा त्याच्या कोणत्याही वस्तू घरात आणू नयेत, ते शुभ मानले जात नाही. यामुळे शनिदेव नाराज होऊ शकतात. याशिवाय तेल, लाकूड, कोळसा आणि मीठ देखील विकत घेऊ नये. (इमेज क्रेडिट: कॅनव्हा) (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


