लेकीसाठी स्कूटर घ्यायचीये? 'या' आहेत 1 लाखांच्या आत येणाऱ्या 125cc स्कूटर, ठरतील बेस्ट
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Best 125cc Scooters Under 1 Lakh: तुम्हालाही तुमच्या लेकीसाठी किंवा बायकोसाठी नवा स्कूटर खरेदी करायचा आहे का? असं असेल तर 1 लाख रुपयांच्या आसपासचे बेस्ट ऑप्शन आपण पाहणार आहोत.
मुंबई : तुम्हाला तुमच्या लेकीसाठी किंवा बायकोसाठी स्कूटर खरेदी करायचे असेल तर आज आपण बेस्ट ऑप्शन पाहणार आहोत. आता 125cc सेगमेंटमध्ये असे अनेक स्कूटर आले आहेत. ज्यामध्ये दमदार इंजिन मिळते. यासोबतच ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डिजिटल डिस्प्ले आणि स्मार्ट फीचर्सही दिले जात आहेत. म्हणजेच आता कमी बजेटमध्ये तुम्हाला स्टाइल, टेक्नॉलॉजी आणि परफॉर्मेंस तिन्हीचं भारी कॉम्बिनेशन मिळू शकतं. चला जाणून घेऊया अशाच 5 शानदार स्कूटर्सविषयी...
advertisement
Suzuki Access 125 दीर्घ काळापासून भारतीय ग्राहकांमध्ये आवडीचा स्कूटर बनला आहे. यामध्ये 124cc चं इंजिन मिळालंय. जो जवळपास 8.5bhp ची पॉवर आणि 10 Nm चा टॉर्क देते. याच्या काही व्हेरिएंट्समध्ये डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसारखे फीचर्स मिळतात. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 78,184 रुपये (एक्स-शोरूम) आहे. ज्यामुळे ती या सेगमेंटमध्ये एक मजबूत ऑप्शन बनते.
advertisement
TVS Jupiter 125 : ज्या लोकांना रोजच्या वापरासाठी आरामदायक आणि प्रॅक्टिकल स्कूटर हवी आहे. त्या लोकांसाठी TVS Jupiter 125 भारी ऑप्शन आहे. यामध्ये 124.8cc चं इंजिन देण्यात आलं आहे आणि काही व्हेरिएंटमध्य स्मार्ट कनेक्ट फीचर्सही मिळतात. याचा मोठा अंडर-सीट स्टोरेज याला आणखी उपयोगी बनवते. या स्कूटरची सुरुवातीची किंमत जवळपास 75,600 रुपये (एक्स-शोरूम) असते.
advertisement
Honda Activa 125 ही भारतीय बाजारात विश्वाससाठी ओळखली जाते. यामध्ये 123.9cc चा फ्यूल-इंजेक्टेड इंजिन मिळते. जी जवळपास 8.3 bhp ची पॉवर आणि 10.5 Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये LED हेडलाइट, डिजिटल डिस्प्ले आणि अनेक गरजेचे फीचर्स देण्यात आले आहेत. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 89,652 रुपये (एक्स-शोरूम) आहे.
advertisement
advertisement








