आली दमदार SUV, मुंबई-पुणे कितीही फिरा, रेंज 2000 किमी अन् किंमत फक्त 13 लाख!
- Published by:sachin Salve
Last Updated:
वाढते इंधनाचे दर आणि प्रदुषणामुळे इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. सध्या मार्केटमध्ये एकापेक्षा एक अशा दमदार आणि उत्तम रेंजच्या कार आहे.
वाढते इंधनाचे दर आणि प्रदुषणामुळे इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. सध्या मार्केटमध्ये एकापेक्षा एक अशा दमदार आणि उत्तम रेंजच्या कार उत्पादन करण्याचा कल वाढला आहे. अशातच चीनची प्रसिद्ध कंपनी BYD ने आणखी एक रेंज क्वीन कार लाँच केली. चीनमध्ये BYD Seal 06 DM-i प्लग-इन हायब्रिड स्टेशन वॅगन लाँच करण्यात आला आहे. या कारची रेंज थोडी थोडकी नव्हे तर तब्बल २००० किमी इतकी आहे. ही एक हायब्रिड कार आहे. विशेष म्हणजे, या कारची किंमत तिथे फक्त १०९,८०० युआन भारतीय चलनामध्ये सुमारे १३ लाख रुपये आहे.
advertisement
युरोपच्या तुलनेत स्टेशन वॅगन चीनमध्ये तितके लोकप्रिय नाहीत. पूर्वी, काही प्रसिद्ध देशांतर्गत वाहन उत्पादकांनी अशा कार बनवल्या होत्या, कारण ग्राहक उंच एसयूव्हीमध्ये प्रवास करणे पसंत करत होते. नवीन पॉवर बेस कार आल्यानंतर चित्र पालटलं आणि स्टेशन वॅगन तयार झाली. कमी बॉडी आणि शानदार लूक, NEV वॅगन क्रॉसओव्हरपेक्षा अधिक कार्यक्षम असल्याचं समोर आलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
१.५-लिटर एस्पिरेटेड इंजिन - Seal 06 DM-i वॅगनमध्ये BYD ची पाचव्या जनरेशनमध्ये प्लग-इन हायब्रिड सिस्टम वापरली आहे. त्याच्या एंट्री-लेव्हल व्हेरियंटमध्ये १.५-लिटर नॅचरली एस्पिरेटेड इंजिन आहे जे ७४ किलोवॅट (९९ एचपी) पॉवर देते आणि १२०-किलोवॅट (१६१ एचपी) इलेक्ट्रिक मोटरसह जोडलेले आहे. हा व्हेरियंट ८.७ सेकंदात १०० किमी/ताशी वेग गाठतो.