Car च्या किंमतीत मिळतेय SUV, Wagon R पेक्षाही 5 अशा स्वस्त एसयूव्ही, दिवाळीत सुरू आहे बंपर ऑफर!
- Published by:Sachin S
Last Updated:
आता कारच्या किंमतीत एसयूव्ही विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. भारतातील मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्ससह इतर कंपन्यांनी दिवाळीत चांगली ऑफर दिली असून किंमतही कमी केली आहे.
जीएसटीमध्ये कपात झाल्यापासून ऑटो इंडस्ट्रीमध्ये स्वस्ताईची लाट आली आहे. एकीकडे कारच्या किंमती कमी झाल्या आहे तर दुसरीकडे एसयूव्हीच्या किंमतीही कमी झाल्या आहे. आधी कार खरेदी करण्याचा लोकांचा कल होता. पण, आता कारच्या किंमतीत एसयूव्ही विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. भारतातील मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्ससह इतर कंपन्यांनी दिवाळीत चांगली ऑफर दिली असून किंमतही कमी केली आहे.
advertisement
Mahindra XUV 3XO - महिंद्रा मोटर्सची X700 ची कॉपी असलेली Mahindra XUV 3XO ही एक बजेट फ्रेंडली एसयूव्ही आहे. Mahindra XUV 3XO वर 45,000 45,000 पर्यंतची सूट दिली आहे. Mahindra XUV 3XO ची किंमत 7.28 लाख ते 14.40 लाख (एक्स-शोरूम) च्या दरम्यान आहे. Mahindra XUV 3XO मध्ये ३ इंजिन पर्याय ऑफर करते - 117hp डिझेल, 111hp 1.2 TCMPFi टर्बो-पेट्रोल आणि 131hp 1.2 TGDi टर्बो-पेट्रोल.
advertisement
advertisement
Hyundai Venue - दक्षिण कोरियन कंपनी Hyundai ची Venue हे एक लोकप्रिय एसयूव्ही आहे. कंपनीने Hyundai Venue वर 50,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर दिली आहे. Hyundai Venue ची किंमत 7.26 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. Venue मध्ये पेट्रोल, टर्बो-पेट्रोल आणि डिझेल इंजिनचे पर्याय दिला आहेत. यात N Line व्हर्जन देखील आहे.
advertisement
Renault Triber - ही सगळ्यात स्वस्त अशी ७ सीटर एमपीव्ही आहे. कंपनीने अलीकडे Renault Triber चं नवीन मॉडेल लाँच केलं आहे. Renault Triber वर 75,000 पर्यंत सूट दिली आहे. Renault Triber ची किंमत ही 5.76 लाख (एक्स-शोरूम) आहे आणि कंपनी यावर 75,000 पर्यंतची ऑफर दिली आहे. यात कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट ऑफर्सचा समावेश आहे. Triber मध्ये 72hp चे पेट्रोल इंजिन दिलं आहे.
advertisement
Nissan Magnite - जपानी कंपनी निसानची Magnite ही भारतात सगळ्यात स्वस्त आणि मस्त अशी एसयूव्ही आहे. या Magnite वर 89,000 रुपयांची सूट दिली आहे. Magnite किंमत 5.62 लाख (एक्स-शोरूम) आहे. कंपनी यावर 89,000 रुपयांपर्यंत सूट दिली आहे. एवढंच नाहीतर कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि 1 ग्रॅम गोल्ड कॉईन ऑफरचा दिली आहे. Magnite मध्ये 72hp पेट्रोल आणि 100hp टर्बो-पेट्रोल इंजिनचे पर्याय दिला आहे.