Electric कारचं खरं सत्य, पेट्रोल-डिझेलच्या वाहनांपेक्षा करतात जास्त प्रदूषण? हे आहे कारण
- Published by:sachin Salve
Last Updated:
ईव्ही आणि सर्वसाधारण गाडी यांमध्ये बॉडी, चॅसिस आणि अन्य घटक जवळपास सारखेच असतात. ते बनवण्यासाठी अॅल्युमिनियम आणि स्टीलसारख्या धातूंचा वापर केला जातो. सर्वसाधारण गाड्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचा वापर होतो, तर ईव्ही बॅटरीवर चालतात, एवढाच फरक असतो.
प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचं संरक्षण व्हावं, म्हणून इलेक्ट्रिक वाहनांची संकल्पना आणली गेली. गेल्या काही वर्षांत ती बऱ्यापैकी रुजू लागली आहे. अनेक योजना येऊ लागल्या आहेत. अलीकडेच भारत सरकारने 10,900 कोटी रुपयांच्या पीएम ई ड्राइव्ह योजनेलाही मंजुरी दिली. अधिकाधिक जणांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला प्राधान्य द्यावं, यासाठी असं केलं जात आहे; मात्र प्रत्यक्षात ईव्हीमुळे अधिक प्रदूषण होत असल्याचं दिसून येत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
एमिशन अॅनालिटिक्सच्या एका रिपोर्टनुसार, ईव्हीचे ब्रेक्स आणि टायर्स यांमुळे तयार होणारं पार्टिक्युलेट मॅटर सर्वसाधारण वाहनांच्या तुलनेत (ICE) 1850 पट अधिक असू शकतं. याचं मुख्य कारण ईव्हीचं जास्त असलेलं वजन हे आहे. कारण त्यांच्या बॅटरीचं वजन जास्त असतं. त्यामुळे टायर आणि ब्रेकवर अधिक दबाव येतो. त्यामुळे घर्षण वाढतं आणि अधिक कण उत्सर्जन होतं. तसंच, बॅटरी उत्पादनाच्या प्रक्रियांमुळेही पर्यावरणाला त्रास होतो.
advertisement
advertisement
चांगल्या बाबी - वर दिलेले सगळे घटक नकारात्मक असले, तरी ईव्हीमधून प्रत्यक्ष कोणतंही उत्सर्जन होत नाही, ही एक मोठी बाब आहे. त्यामुळे शहरातल्या वातावरणाच्या गुणवत्तेत सुधारणा होण्यास हातभार लागू शकतो. तसंच, ईव्हीचा पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यासाठी बॅटरीच्या उत्पादनात सुधारणा, नवीकरणीय ऊर्जास्रोतांचा वापर, टायर आणि ब्रेकच्या डिझाइनमध्ये नावीन्य आदींची गरज आहे. यातून ईव्हीचे पर्यावरणीय फायदे आणि तोटे यांचं संतुलन होऊ शकेल. ते लक्षात घेऊन आवश्यक त्या सुधारणा करणं गरजेचं आहे.