10 लाखांची कार विकल्यावर शोरुम मालकाला किती प्रॉफिट मिळतो? समजून घ्या गणित
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
भारतातील कार डीलर्सना कार विकल्यावर सरासरी किती मार्जिन मिळते. त्यांची किती कमाई होते याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
डीलर किती नफा कमावतो? : मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय ऑटोमोबाईल डीलर्सची संघटना असलेल्या FADA (फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन) च्या सर्वेक्षणानुसार, भारतातील कार डीलर्सना कार विकल्यावर सरासरी 2.9% ते 7.49% मार्जिन मिळते. म्हणजेच, एक सामान्य डीलर प्रत्येक कारवर जास्त कमाई करत नाही, परंतु मोठ्या प्रमाणात विकल्या जाणाऱ्या कार त्यांना चांगला नफा देतात.
advertisement
10 लाख रुपयांच्या कारवरील डीलरच्या कमाईचा अंदाज : समजा एका कारची एक्स-शोरूम किंमत 10 लाख रुपये आहे आणि डीलरला त्यावर 5% मार्जिन मिळत आहे, तर त्या एका कारवरील डीलरची कमाई थेट 50,000 रुपये होईल. पण ही संपूर्ण कमाई नाही. या रकमेतून डीलरला त्याच्या कर्मचाऱ्यांचा पगार, शोरूम भाडे, सर्व्हिसिंग खर्च आणि मार्केटिंग खर्च भरावा लागतो.
advertisement
advertisement
advertisement