Defender सारखा लूक, 17 किमी मायलेज, 7 जण आरामात बसतील, किंमतही 8 लाखांपासून!
- Published by:Sachin S
Last Updated:
भारतातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनी पैकी एक असलेल्या महिंद्रा मोटर्सने एकापेक्षा एक गाड्या लाँच केल्या आहे. काही दिवसांपासून महिंद्रा Mahindra Bolero Neo ही खास शहरीभागातील ग्राहकांसाठी धाकड अशी एसयूव्ही आणली.
भारतात सध्या मजबूत आणि पॉवरफुल गाड्या विकत घेण्याकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. जीएसटीच्या दरात कपात झाल्यामुळे आता कारच्या किंमतीत एसयूव्ही उपलब्ध झाली आहे. त्यामुळे दणकट अशा SUV ते चांगले दिवस आले आहे. भारतातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनी पैकी एक असलेल्या महिंद्रा मोटर्सने एकापेक्षा एक गाड्या लाँच केल्या आहे. काही दिवसांपासून महिंद्रा Mahindra Bolero Neo ही खास शहरीभागातील ग्राहकांसाठी धाकड अशी एसयूव्ही आणली. या एसयूव्ही लूक आणि किंमत हे अगदी बजेटमध्ये आहे. या Mahindra Bolero Neo ची किंमत फक्त 8.69 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. ही एक बजेटमधली डिफेंडर आहे.
advertisement
advertisement
Mahindra Bolero Neo च्या N4 व्हेरिएंट ची किंमत 8.69 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. हे एक बेस व्हेरिएंट आहे. पण यामध्ये चांगले फिचर्स दिले आहे. Mahindra Bolero Neo च्या समोर नवीन ग्रिल, नवीन काँक्रीट ग्रे रंग आआणि मोचा ब्राउन इंटीरियर थीम दिली आहे. सुरक्षेसाठी Mahindra Bolero Neo मध्ये २ एअरबॅग समोर आणि ABS+EBD दिले आहे. तसंच RideFlo Tech आणि ट्विन-पॉड LCD इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यासारखे फिचर्स दिले आहे. ही एक 7-सीटर एसयूव्ही आहे.
advertisement
Mahindra Bolero Neo चं आणखी एक N8 व्हेरिएंट आहे, ज्याची किंमत 9.45 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. आधीच्या N4 व्हेरियंटपेक्षा या व्हेरियंटमध्ये जास्त फिचर्स दिले आहे. यामध्ये जीन्स ब्लू आणि काँक्रिट ग्रे अशा रंगाचा पर्याय आहे. गाडीच्या आतमध्ये विनाइलऐवजी फॅब्रिक सीट्स आणि मागची दुसरी रो फोल्डेबल आहे. तसंच, ब्लूटूथ, USB आणि AUX कनेक्टिव्हिटीसह म्युझिक प्लेअर तसंच स्टीयरिंग-माउंटेड ऑडिओ कंट्रोल दिले आहे.
advertisement
Mahindra Bolero Neo आणखी एक व्हेरियंट आहे जे बजेटमध्ये आहे, N10 व्हेरिएंटची किंमत 9.79 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. N10 व्हेरिएंटमध्ये 22.8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, क्रूझ कंट्रोल, हाइट-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि फॉग लॅम्प्ससारखे फिचर्स आहे. तसंच R-15 सिल्वर अलॉय व्हील्स, USB-C चार्जिंग पोर्ट, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ORVMs आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी ISOFIX माउंट्स दिले आहेत.
advertisement
advertisement
Mahindra Bolero Neo चं N11 व्हेरिएंट हे टॉप मॉडेल आहे. या मॉडेलची किंमत 9.99 लाख एक्स-शोरूम इतकी आहे. हे व्हेरियंट N10 (O) पेक्षा कमी असलं तरी यामध्ये अनेक प्रीमियम फीचर्स दिले आहे. ड्युअल-टोन रंग , R16 डार्क मेटॅलिक ग्रे अलॉय व्हील्स, नवीन लूनर ग्रे इंटीरियर थीम आणि पार्किंगसाठी रियर-व्ह्यू कॅमेरा दिला आहे.







