Maruti ची 33 किमी मायलेज देणारी कार 1999 रुपये EMI वर कशी येईल? Down Payment किती लागेल? सत्य समोर
- Published by:Sachin S
Last Updated:
मारुती सुझुकीने चक्क 1999 रुपये EMI वर कार घेऊन जा अशी ऑफर दिली आहे. साहजिकच 1999 रुपये EMI वर कार कशी मिळू शकते, असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे.
दिवाळीच्या सणात खरेदीसाठी सगळीकडे तुफान अशी गर्दी झाली आहे. त्यातचं जीएसटीच्या दरात कपात केल्यामुळे वाहनांच्या किंमती कमालीच्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्यांनी किंमती तर कमी केल्या आहेच, पण दिवाळी ऑफरही दिल्या आहेत. अशातच देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने चक्क 1999 रुपये EMI वर कार घेऊन जा अशी ऑफर दिली आहे. साहजिकच 1999 रुपये EMI वर कार कशी मिळू शकते, असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. पण यामागे डाऊन पेमेंटचं मोठं गणित आहे तरच 1999 EMI वर कार येईल.
advertisement
जीएसटी कपात आणि दिवाळीच्याा संधीचा फायदा घेून मारुती सुझुकीने आपल्या Alto k10 या कारवर १९९९ रुपये EMI ऑफर आणली आहे. जीएसटी कपातीनंतर, alto ची किंमत कमी झाली आहे. नुसती alto ची किंमत कमी झाली नाहीतर इतरही गाड्यांच्या किंमती कमी झााल्या आहे. दिवाळीचा सिझनमध्ये मारुती सुझुकीने alto k10 आणि S-Presso या दोन कारवर 1999 रुपये EMI ची ऑफर आणली आहे.
advertisement
1999 रुपये EMI शक्य आहे का? 1999 रुपये EMI हा एखाद्या बाईकवर असू शकतो, यात शंका नाही. पण कारवर 1999 रुपये EMI कसा बसू शकतो. तर मारुती सुझुकीने इतका कमी EMI कसा दिला असा साहजिक प्रश्न पडला असेल. पण हे सगळं फायन्सस कंपन्याचं गणित आहे. मुळात alto k10 ची किंमत एसटीडी (ओ) व्हेरिएंटची किंमत आता फक्त ३.६९ लाख रुपये आहे. त्यामुळे ही कार विकत घेण्यासाठी कमीत कमी डाऊन पेमेंट ऑफर आहे.
advertisement
समजा तुम्ही, २० ते ३० टक्के डाऊनपेमेंट म्हणजे 90 ते 1 लाख रुपये केलं तर आणि उरलेली रक्कम तुम्ही २.६९ ही कमी EMI वर घेऊ शकतात. पण, याचा अर्थ 1999 रुपये EMI येईल हे शक्य नाही. कारण, ५ ते ७ वर्षांची फेड ठेवली तर EMI हा फक्त 1999 रुपयांपर्यंत येऊ शकत नाही. हा EMI साधारपणे ४ ते ५ हजारापर्यंत इतका येऊ शकतो. पण, यामध्ये बऱ्याच वेळा तुम्ही डाउन पेमेंट किती करतात यावर हा EMI चा सगळा खेळ अवलंबून आहे.
advertisement
advertisement
advertisement
Alto k10 मध्ये आता ६ एअर बॅग्स देण्यात आली आहे. कारमध्ये आता ६ एअरबॅग्ज (फ्रंट + साइड + कर्टन एअरबॅग्ज), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), सर्व प्रवाशांसाठी ३-पॉइंट सीट बेल्ट, मागील पार्किंग सेन्सर्स आणि सामान ठेवण्यासाठी क्रॉसबार असे फिचर्स दिले आहेत.
advertisement
advertisement