नाद करतीये का? आता घ्यायला लागतेय, Maruti च्या मायलेज किंग कारला मिळाले 5 स्टार सेफ्टी रेटिंग!
- Published by:sachin Salve
Last Updated:
मारुती सुझुकीने सुद्धा आपली कारही सेफ्टीमध्ये कुणापेक्षा कमी नाही हे दाखवून दिलं आहे. मारुती सुझुकी डिझायरने भारत NCAP (न्यू कार सेफ्टी असेसमेंट प्रोग्राम) च्या क्रॅश टेस्टमध्ये ५-स्टार रेटिंग मिळवले आहे.
भारतात मारुती सुझुकी ही सर्वात जास्त कार उत्पादक कंपनी म्हणून नावारुपास आली. मायलेज आणि स्वस्त अशी मारुतीच्या गाड्यांची ओळख आहे. पण गेल्या काही वर्षांपासून सेफ्टी कार म्हणून टाटा आणि महिंद्राने मार्केटमध्ये दबदबा निर्माण केला होता. आता मारुती सुझुकीने सुद्धा आपली कारही सेफ्टीमध्ये कुणापेक्षा कमी नाही हे दाखवून दिलं आहे. सेकंड जनरेशन असलेली मारुती सुझुकी डिझायरने भारत NCAP (न्यू कार सेफ्टी असेसमेंट प्रोग्राम) च्या क्रॅश टेस्टमध्ये ५-स्टार रेटिंग मिळवले आहे.
advertisement
भारत एनसीएपीच्या चाचणीत समाविष्ट झालेली पहिली सेडान, डिझायरने या चाचणीत उत्कृष्ट कामगिरी केली, अडल्ट ऑक्युपंट सेफ्टी (एओपी) मध्ये ३२ पैकी २९.४६ गुण आणि चाइल्ड ऑक्युपंट सेफ्टी (COP) मध्ये ४९ पैकी ४१.५७ गुण मिळवले. गेल्या वर्षी ग्लोबल एनसीएपी चाचणीतही डिझायरला ५ स्टार मिळाले होते. ५ स्टार सेफ्टी मिळवणारी ही भारतातील पहिली सेडान बनली आहे.
advertisement
LXI ट्रिमची चाचणी - BNCAP ने डिझायरच्या बेस एलएक्सआय ट्रिमची चाचणी केली, ज्यामध्ये ६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ईएससी), हिल होल्ड असिस्ट, ईबीडीसह एबीएस, आयएसओएफआयएक्स चाइल्ड सीट अँकर पॉइंट्स, रिमाइंडर्ससह सर्व प्रवाशांसाठी ३-पॉइंट सीटबेल्ट, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, ओव्हरस्पीड अलर्ट, रियर डिफॉगर आणि इतर सुरक्षा फिचर्स समाविष्ट आहेत. ही यादी सर्व डिझायर ट्रिम लेव्हलमध्ये सारखीच आहे, म्हणून ५-स्टार रेटिंग संपूर्ण व्हेरिएंट लाइन-अपला लागू होते.
advertisement
काय चाचणी घेण्यात आली? फ्रंटल ऑफसेट डिफॉर्मेबल बॅरियर टेस्ट दरम्यान, ड्रायव्हरचे डोके, मान, पेल्विस, मांड्या आणि पायांचे संरक्षण 'चांगले' रेटिंग देण्यात आले आहे. तर छाती आणि टिबियाला 'मार्जिनल' आणि 'फेअर' गुण मिळाले. सह-ड्रायव्हरचे डोके, मान, पेल्विस, मांड्या आणि डाव्या टिबिया संरक्षणाला 'चांगले' रेटिंग देण्यात आले, परंतु छाती आणि उजव्या टिबिया संरक्षणाला 'फेअर' गुण मिळाले. साइड पोल इम्पॅक्ट टेस्ट साइड पोल इम्पॅक्ट टेस्टसाठी, ड्रायव्हरच्या सर्व भागांना 'चांगले' गुण मिळाले आहे.
advertisement
छातीच्या संरक्षणासाठी 'फेअर' रेटिंग वगळता, साइड मूव्हेबल डिफॉर्मेबल बॅरियर टेस्टसाठी देखील चांगले होते. डायनॅमिक टेस्ट डायनॅमिक टेस्टमध्ये, डिझायरने चाइल्ड रिस्ट्रेंट सिस्टम वापरून २३.५७ गुण मिळवले. १८ महिन्यांच्या आणि ३ वर्षांच्या मुलांच्या डमींच्या बाजूच्या संरक्षणासाठी, कॉम्पॅक्ट सेडानने ४ पैकी ४ गुणांचा परिपूर्ण डायनॅमिक स्कोअर मिळवला.
advertisement
advertisement