Maruti Victorious: आता Creta विकून टाका, Maruti ने लाँच केली स्वस्त आणि टँकसारखी SUV, किंमतही कमी
- Published by:Sachin S
Last Updated:
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपल्या Arena च्या छताखाली नवी कोरी Victoris SUV लाँच केली आहे.
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपल्या Arena च्या छताखाली नवी कोरी Victoris SUV लाँच केली आहे. मागील काही दिवसांपासून या Victoris SUV ची बरीच चर्चा रंगली होती अखेरीस कंपनीने या एसयूव्हीवरून पडदा बाजूला केला आहे. मारुती सुझुकीची ही पाचवी SUV आहे. या एसयूव्हीचं नाव Maruti Victoris असं ठेवण्यात आलं आहे. या एसयूव्हीच्या किंमतीची अद्याप घोषणा केली नाही पण वेगवेगळ्या 6 ट्रीम व्हेरियंटमध्ये ही SUV उपलब्ध असणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
एवढंच नाहीत Maruti Suzuki Victoris SUV मध्ये हायटेक टेक्नोलॉजीचा वापर केला आहे, त्यामुळे 8 अॅडजस्टेबल व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, सनरूफ, आणि 60W फास्ट चार्जिंग मिळणार आहे. या शिवाय ऑटो एलेक्सा व्हाईस असिस्टेंट विद AI, सुझुकी कनेक्टचे 60+ कनेक्टेड कार फिचर्स आणि 8-स्पीकर सराउंड साऊंड सिस्टिम सारखे फिचर्सही दिले आहे.
advertisement
कलर ऑप्शन - Victoris मध्ये 10 वेगवेगळ्या रंगाचा पर्याय दिला आहे. यामध्ये Arctic White, Splendid Silver, Eternal Blue, Sizzling Red, Magma Grey, Bluish Black आणि Mystic Green रंगाचा समावेश आहे. या शिवाय SUV मध्ये ३ ड्यूल-टोन कलर कॉम्बिनेशन सुद्धा दिले आहे. Victorisमध्ये एकूण 6 ट्रिम व्हेरिएंट असणार आहे. ज्यामध्ये LXI, VXI, ZXI, ZXI(O), ZXI+, आणि ZXI+(O) चा समावेश आहे.
advertisement
इंजिन कसं असेल? Maruti Suzuki Victoris मध्ये वेगवेगळ्या पावरट्रेनचा पर्याय दिला आहे. यामध्ये 1.5-लिटर नॅचरुल एस्पिरेटेड (NA) पेट्रोल इंजिन हे माईल्ड-हायब्रिड टेक आणि 1.5-लिटर स्ट्रॉन्ग हायब्रिड इंजिनचा समावेश आहे. पेट्रोल व्हेरिएंटसह कंपनीने फॅक्टरी फिटेड CNG ऑप्शन दिलं आहे. विशेष म्हणजे, सीएनजीची टाकीही गाडीच्या अंतर्गत दिली आहे. ज्यामुळे बॅग ठेवण्यासाठी मोठी जागा मिळाली आहे.
advertisement
advertisement
advertisement
Maruti Victoris चं इंटिरिअर हे आधुनिक आहे. यामध्ये 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम दिले जाणार आहे. तसंच या एसयूव्हीमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले स्पोर्ट दिलं. या शिवाय या एसयूव्हीमध्ये स्टँडर्ड 6 एअरबॅग, सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, वायरलेस फोन चार्जर आणि मल्टिपल ड्राइव्ह मोड दिले जाणार आहे. या शिवाय फ्लॅट-बॉटम स्टिअरिंग व्हिल आणि ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल सारखे फिचर्स दिले आहे.
advertisement
advertisement
Maruti Victoris ही एक मिड-साइज SUV आहे. या कारचा मुकाबला Hyundai Creta आणि Kia Seltos सारख्या Popular SUVs शी होणार आहे. किंमतीबद्दल अद्याप कोणतीही घोषणा केली नाही. पण या SUV ची किंमत 10 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. ही एसयूव्ही Grand Vitara पेक्षा स्वस्त असणार आहे आणि Brezza पेक्षा जास्त फिचर्सने लेस असेल.


