Maurti ची शानदार SUV आता CNG मध्ये लाँच, मायलेज 26 किमी, किंमतही कमी!
- Published by:sachin Salve
Last Updated:
आता मध्यमवर्गीयांना परवडतील अशा SUV सुद्धा अलीकडेच लाँच केल्या होत्या. त्यातच आता मारुती सुझुकीने आपली ग्रँड विटारा एस-सीएनजी 2025
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने मध्यमवर्गीय कुटुंबीयांना डोळ्यासमोर ठेवून अनेक अशा कार तयार केल्यात. आता मध्यमवर्गीयांना परवडतील अशा SUV सुद्धा अलीकडेच लाँच केल्या होत्या. त्यातच आता मारुती सुझुकीने आपली ग्रँड विटारा एस-सीएनजी 2025 लाँच केली आहे. नव्या ग्रँड विटारामध्ये नवीन नियमांनुसार, 6 एअर बॅग्स दिल्या आहे.
advertisement
नवीन ग्रँड विटारामध्ये अपग्रेडेड एस-सीएनजी मॉडेल मध्यम आकाराच्या एसयूव्हीमध्ये चांगली सुरक्षा, कार्यक्षमता आणि प्रीमियम फिचर्स दिले आहे. ग्रँड विटारा ४,३४५ मिमी लांबी, १,७९५ मिमी रुंदी आणि १,६४५ मिमी उंचीची आहे. या कारमध्ये १.५-लिटर के-सिरीज ड्युअल जेट, ड्युअल व्हीव्हीटी इंजिन दिलं आहे. सीएनजी मोडमध्ये जास्तीत जास्त ८७.८ बीएचपी पॉवर आणि १२१.५ एनएम पीक टॉर्क निर्माण करते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
केबिनमध्ये वायरलेस कनेक्टिव्हिटीसह ९-इंचाचा स्मार्टप्ले प्रो+ इन्फोटेनमेंट सिस्टम, टीपीएमएस, सुझुकी कनेक्ट आणि रीअरव्ह्यू कॅमेरा यांचा समावेश आहे. सुरक्षिततेच्या बाबतीत, ६ एअरबॅग्ज व्यतिरिक्त, एसयूव्हीमध्ये हिल होल्ड असिस्टसह ईएसपी, ईबीडीसह एबीएस, आयएसओफिक्स चाइल्ड सीट माउंट्स आणि फ्रंट आणि रीअर डिस्क ब्रेक आहेत.
advertisement