Royal Enfield ची बारीक बुलेट लूक पाहून म्हणाल, ही तर लुनाच! पहिल्यांदाच PHOTO समोर

Last Updated:
मुळात रॉयल एनफील्डने आतापर्यंत अशाच वजनदार बाईक तयार केल्या आहेत. पण काळानुसार, बदल करत रॉयल एनफील्डने ईलेक्ट्रिक वाहन उत्पादन उडी घेतली आहे.
1/7
रॉयल एनफील्डची बुलेट नुसतं नाव जरी कुणी काढलं तर वजनदार आणि धडधड आवाज करत येणारी बुलेट सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभी राहते. मुळात रॉयल एनफील्डने आतापर्यंत अशाच वजनदार बाईक तयार केल्या आहेत. पण काळानुसार, बदल करत रॉयल एनफील्डने ईलेक्ट्रिक वाहन उत्पादन उडी घेतली आहे. कंपनीने आपली पहिली फ्लाईंग फ्ली रेंज C6 आणि S6  (Flying Flea )  ही पूर्णपणे इलेक्ट्रिक बाइक तयार केली आहे. या बाइकची चाचणी सध्या सुरू आहे. अशातच लडाखच्या रस्त्यावर ही बाइक पाहण्यास मिळाली. 

advertisement
2/7
चेन्नई इथं Flying Flea  बाईक तयार करण्यात आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला नवीन फ्लाइंग फ्ली ब्रँड अंतर्गत दोन इलेक्ट्रिक मोटरसायकली लाँच होणार आहे.  C6 जो एक क्लासिक रोडस्टर आहे आणि S6 जो त्याचा स्क्रॅम्बलर प्रकार आहे. C6 प्रथम 2026 च्या सुरुवातीला लाँच होणार आहे, तर S6 2026 च्या अखेरीस लाँच होण्याची शक्यता आहे.

3/7
दोन्ही बाइक या पूर्णपणे कॅमफ्लाजमध्ये गुंडाळलेले आहेत. पण, बाइक कशी असेल याचा अंदाज सगळ्यांना आला. रॉयल एनफील्ड Flying Flea C6 यापूर्वी भारतात चाचणी करताना दिसली आहे, पण, पहिल्यांदाच  जेव्हा दोन्ही बाइक एकत्र दिसल्या आहेत.

4/7
दोन इलेक्ट्रिक बाइकमध्ये फारसा फरक नाही. C6 मध्ये निओ-रेट्रो क्लासिक स्टाईलिंग आहे तर S6 मध्ये थोडे अधिक मजबूत आकर्षण आहे, ज्यामध्ये वेगवेगळे हँडलबार, ऑफसेट इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि उच्च फ्रंट फेंडर आहेत. C6 आणि S6 मधील आणखी एक फरक म्हणजे, C6 रोड-बायस्ड टायर्ससह अलॉय व्हील्सवर चालते तर S6 ड्युअल-पर्पज टायर्ससह स्पोक व्हील्स आहेत.

5/7
पूर्णपणे EV प्लॅटफॉर्म -दोन्ही बॅटरीवर चालणाऱ्या आणि EV प्लॅटफॉर्मवर बाइक तयार केल्या आहे.  ज्याला अंतर्गत L प्लॅटफॉर्म म्हणतात. एनफिल्डच्या आगामी इलेक्ट्रिक बाइक्स पारंपारिक पेट्रोल-चालित मोटारसायकलींपेक्षा खूपच बारीक आहेत.  हे स्पष्टपणे मूळ Flying Flea पासून प्रेरणा घेतली आहे. ज्यामध्ये मिनिमलिस्ट डिझाइन, स्लिम, लो-स्लंग प्रोफाइल, गोल हेडलॅम्प, गर्डर फ्रंट फोर्क्स आणि एक लांब फेंडर आहे.
पूर्णपणे EV प्लॅटफॉर्म - दोन्ही बॅटरीवर चालणाऱ्या आणि EV प्लॅटफॉर्मवर बाइक तयार केल्या आहे.  ज्याला अंतर्गत L प्लॅटफॉर्म म्हणतात. एनफिल्डच्या आगामी इलेक्ट्रिक बाइक्स पारंपारिक पेट्रोल-चालित मोटारसायकलींपेक्षा खूपच बारीक आहेत.  हे स्पष्टपणे मूळ Flying Flea पासून प्रेरणा घेतली आहे. ज्यामध्ये मिनिमलिस्ट डिझाइन, स्लिम, लो-स्लंग प्रोफाइल, गोल हेडलॅम्प, गर्डर फ्रंट फोर्क्स आणि एक लांब फेंडर आहे.
advertisement
6/7
ट्विन फ्लाइंग -सध्या, आगामी ट्विन Flying Flea बाइक्सबद्दल माहिती खूपच कमी आहेत. फिचर्सबद्दल बोलायचं झालं तर, एलईडी लाइटिंग आणि टर्न सिग्नल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेशनसह पूर्णपणे डिजिटल TFT वर्तुळाकार इन्स्ट्रुमेंट कन्सोलने सज्ज आहे. 
ट्विन फ्लाइंग - सध्या, आगामी ट्विन Flying Flea बाइक्सबद्दल माहिती खूपच कमी आहेत. फिचर्सबद्दल बोलायचं झालं तर, एलईडी लाइटिंग आणि टर्न सिग्नल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेशनसह पूर्णपणे डिजिटल TFT वर्तुळाकार इन्स्ट्रुमेंट कन्सोलने सज्ज आहे. 
advertisement
7/7
 आधुनिक फ्लाइंग फ्लीमध्ये ट्रॅक्शन कंट्रोल आणि मल्टीपल राइड मोड्स सारखी फिचर्स असेल. बॅटरी किंवा मोटर स्पेसिफिकेशनबद्दल कोणतीही माहिती नाही, परंतु C6 आणि S6 एका चार्जवर 100 किमीची रेंज देण्याची शक्यता आहे.

Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement