Ola ची स्कुटर विसरा,आली 400 किमी रेंज अन् किंमतही कमी, लेकाला घेऊन द्या सुपर स्पीडवाली Scooter
- Published by:Sachin S
Last Updated:
सिंपल एनर्जीने आपल्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर रेंजमध्ये वाढ करत Gen 2 स्कूटर सिरीज लॉन्च केली आहे. या स्कुटरची रेंज ही 400 किमी इतकी आहे. तसंच भारतातील इतक इलेक्ट्रिक स्कुटरपेक्षा किंमतही कमी आहे.
भारतात सध्या जीएसटीच्या दरात कपात झाल्यानंतर वाहन विक्रीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. अशातच मध्यमवर्गीय कुटुंबीय आता स्कुटर खरेदी त्यातही ईव्ही असेल तर असा पर्याय शोधत आहे. ईलेक्ट्रिक स्कुटर सेगमेंटमध्ये आता चांगलेच पर्याय उपलब्ध आहे. अशातच सिंपल एनर्जीने आपल्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर रेंजमध्ये वाढ करत Gen 2 स्कूटर सिरीज लॉन्च केली आहे. या स्कुटरची रेंज ही 400 किमी इतकी आहे. तसंच भारतातील इतक इलेक्ट्रिक स्कुटरपेक्षा किंमतही कमी आहे.
advertisement
बंगळुरू येथील EV कंपनीने सिंपल वन आणि सिंपल वन एसचे अपडेटेड Gen 2 व्हर्जन मॉडेल लाँच केलं आहे. या रेंजमध्ये टॉपवर सिंपल अल्ट्रा आहे, ज्यात 6.5 kWh ची बॅटरी आहे, जी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या क्षमतेची आहे. अल्ट्राचा परफॉर्मन्स हा 0 ते 40 किलोमीटर प्रतितास वेग फक्त 2.77 सेकंदात गाठतो. या स्कुटरचा टॉप स्पीड 115 किलोमीटर इतका आहे.
advertisement
advertisement
simple one gen 2 मध्ये आता दोन बॅटरी पर्याय दिला आहे. 4.5 kWh व्हर्जनची IDC रेंज 236 किलोमीटर आहे. .simple one gen 2 ची किंमत 1,69,999 रुपये (एक्स-शोरूम, बंगळुरू) पासून सुरू होते. 5 kWh व्हेरिएंटची रेंज 265 किलोमीटर IDC आहे. या स्कुटरची सुरुवातीची किंमत 1,77,999 रुपये आहे. दोन्ही व्हर्जन लगेच खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
advertisement
advertisement
advertisement
simple one gen 2 मध्ये 1 लिटरचे फ्रंट ग्लोव्हबॉक्स, डेडिकेटेड चार्जिंग पोर्ट, नवीन डॅशबोर्ड आणि नवीन रायडर कंट्रोल्सही आहेत. ट्रॅक्शन कंट्रोल, क्रूझ कंट्रोल आणि चार-लेव्हल रीजेनेरेटिव ब्रेकिंगसारखी वैशिष्ट्येही मिळतात. याशिवाय 35 लीटरचे अंडरसीट स्टोरेज आणि 780 mm ची अधिक आरामदायक सीट हाइट दिली आहे.
advertisement
simple one gen 2 मध्ये 4.5 kWh सिंपल वन Gen 2 मध्ये 6.4 kW आणि 52 Nm आउटपुट मिळतो, जो 0 ते 40 किलोमीटर प्रतितास वेग 3.3 सेकंदात गाठतो. या स्कुटरचा टॉप स्पीड 90 किलोमीटर प्रतितास इतका आहे. 5 kWh व्हर्जनमध्ये आउटपुट वाढून 8.8 kW आणि 72 Nm होतो. जो अल्ट्राच्या 115 किलोमीटर प्रतितास टॉप स्पीडसारखा आहे आणि 0 ते 40 किलोमीटर प्रतितास वेग फक्त 2.55 सेकंदात गाठतो.
advertisement
simple one gen 2 दोन्ही व्हेरिएंटमध्ये सहा रायडिंग मोड्स दिले आहेत आणि हे डिस्क ब्रेक्स व CBS ने सुसज्ज आहेत. सिंपल वन एस Gen 2 मध्येही अनेक बदल करण्यात आले आहेत. यात 3.7 kWh बॅटरी आहे, जी 6.5 kW आणि 52 Nm आउटपुट देते .त्याची टॉप स्पीड 90 किलोमीटर प्रतितास आहे आणि 0 ते 40 किलोमीटर प्रतितास वेग 3 सेकंदात पकडतो.
advertisement
advertisement








