photos : वडिलाचं निधन झालं, तरीही खचला नाही, स्वत:ला सिद्ध केलं, आज लोकंही करतायेत कौतुक
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
आयुष्यात कितीही संकटे आली तरी मी जिद्दीने पुन्हा लढत राहील आणि आपले स्वप्न पूर्ण करत राहीन, याच विचारातून अनेक मुले मुली कठोर परिश्रम करतात आणि शेवटी आपली स्वप्ने एक दिवस नक्की पूर्ण करतात. (धीर राजपूत/फिरोजाबाद, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
advertisement
मयंक वर्माने सांगितले की, एक वर्ष कठोर संघर्ष आणि मेहनत केली. आता त्याची निवड भारतीय नौदलात झाली आहे. त्याच्या या यशानंतर कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. मयंक वर्माने ज्याठिकाणी नौदलाच्या परीक्षेची तयारी केली, त्या नौ सेना डिफेन्स अकादमीचे डायरेक्टर माधव शर्मा यांनी सांगितले की, सुमारे दीड वर्षांपूर्वी मयंक कोचिंगच्या तयारीसाठी याठिकाणी आला होता.
advertisement
याठिकाणी सकाळी 6 वाजल्यापासून शारीरिक तयारी सुरू होते आणि संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कोचिंगची तयारी केली जाते. मात्र, मयंक एक दिवस आला आणि म्हणाला की, त्याच्याकडे फीस भरण्यासाठी पैसे नाहीत. तसेच कुटुंबाच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीबाबत माहिती दिली. त्यानंतर त्याची मेहनत आणि जिद्द पाहता त्याची फी माफ करण्यात आली.
advertisement


