वडिलांना वाटायचं इंजीनिअर व्हावं, पण मुलगी बनली डॅशिंग आयपीएस ऑफिसर, श्वेता चौबे यांची love story ही रंजक
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
भारतामध्ये अशा अनेक महिला आयपीएस अधिकारी आहेत, ज्यांच्याबद्दल लोकांच्या मनात एक आदर आहे. तसेच त्या लेडी सिंघम म्हणूनही ओळखल्या जातात. आज अशाच एका महिला आयपीएस अधिकाऱ्याबाबत आपण जाणून घेणार आहोत, ज्यांची संपूर्ण राज्यात ख्याती आहे. (हिना आजमी, प्रतिनिधी, डेहराडून)
advertisement
advertisement
श्वेता चौबे यांचे बालपण छत्तीसगड राज्यातील दुर्ग येथे गेले. 1997 मध्ये 12वी नंतर त्यांनी दिल्लीतून बीए आणि मानसशास्त्रात एमए केले. यासोबतच त्यांनी पीएचडीची तयारीही केली. शिक्षण झाल्यानंतर त्यांनी जेएनयूमध्ये लेक्चरर म्हणून काही काळ सेवाही दिली. त्यानंतर त्यांनी 2002 मध्ये आयपीएस परीक्षेची तयारी केली आणि 2005 मध्ये त्यांची निवड झाली. आज त्या उत्तराखंडमधील एक डॅशिंग अधिकारी म्हणून ओळखल्या जातात.
advertisement
2005 मध्ये निवड झाल्यावर त्यांना 2006 मध्ये पहिली पोस्टिंग ही उत्तराखंडची राजधानी डेहराडून याठिकाणी मिळाली. यानंतर 2007 मध्ये त्यांना हरिद्वारमध्ये वाहतूक आयुक्त बनवण्यात आले. 2010 मध्ये कुंभ दरम्यानही त्यांना वाहतूक आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली होती. 2015 मध्ये, श्वेता यांची नैनिताल याठिकाणी पोलीस अधीक्षक शहर पदावर नियुक्ती करण्यात आली.
advertisement
2016 मध्ये हरिद्वारमध्ये अर्धकुंभाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी त्यांना वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या कार्यामुळे त्यांची नंतर खूप प्रशंसा करण्यात आली. कोरोना काळातही त्यांनी कौतुकास्पद कार्य केले. यानंतर त्यांना पौडी गढवाल याठिकाणी पोलीस अधीक्षक बनवण्यात आले होते. मात्र, आता नुकतीच त्यांची डेहराडून पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.
advertisement
आयपीएस अधिकारी श्वेता चौबे यांची प्रेमकहाणीसुद्धा रंजक आहे. 2005 साली IPS श्वेता चौबे आणि ATI अधिकारी मणिकांत मिश्रा यांची ट्रेनिंग दरम्यान भेट झाली. दोघांमध्ये मैत्री झाली. मनातल्या मनात दोघेही एकमेकांना आवडू लागले. यानंतर मणिकांत यांनी श्वेता यांना प्रपोज केले. मात्र, त्यांनी उत्तर दिले नाही. यानंतर 6 महिने वाट पाहिल्यानंतर श्वेता यांनी घरी सर्व काही सांगितले आणि त्यानंतर त्यांचे लग्न झाले. आज त्यांना दोन मुले आहेत.


