photos : आई-वडिलांसाठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, मायानगरी सोडत परतला घरी, आता काय करतोय?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
बिहारमधील पाटणाच्या बोरिंग रोड भागात एक्टर चाय वालाच्या नावाने दुकान चालवणारा विकास आर्यन सध्या खूप चर्चेत आहे. लोकांना त्याचा चहा, कॉफी आणि कोल्ड कॉफीही खूप आवडतो. मात्र, या उन्हाळ्यात याठिकाणी थंड लस्सी, मसालेदार ताक आणि मॉकटेलचाही आस्वाद घेता येणार आहे. या एक्टर चहा वाल्याची कहाणी फार रंजक राहिली आहे. ती काय आहे हे जाणून घेऊयात. (उधव कृष्ण/पाटणा, प्रतिनिधी)
विकास यांनी सांगितले की, त्यांनी अनेक अशा विविध टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. क्राइम पेट्रोल, सावधान इंडिया, कुमकुम भाग्य, पवित्र बंधन यासारख्या प्रसिद्ध असलेल्या टीव्ही कार्यक्रमांमध्ये अभिनेता म्हणून त्यांनी कार्य केले. तसेच काही जाहिरातीही त्यांनी केल्या. आता विकास आर्यन लोकांना स्वादिष्ट आणि थंड लस्सी उपलब्ध करुन देत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


