125 देश अन् तब्बल 10 हजार उमेदवारांमध्ये या भारतीय तरुणाची निवड, मिळाला मोठा जागतिक सन्मान
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
शरद सागर हे 2021 मध्ये हार्वर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ एज्युकेशनमध्ये विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले पहिले भारतीय ठरले होते. 2023 मध्ये, फेमिनाने भारतीय दिग्गज मुकेश अंबानी, विराट कोहली, नीरज चोप्रा, आनंद महिंद्रा आणि शाहरुख खान यांच्यासह भारतातील 60 सर्वाधिक प्रशंसनीय पुरुषांच्या यादीत शरद सागर यांचाही समावेश केला होता.
शरद सागर हे बिहारच्या सीवान येथील रहिवासी असून आज ते देश आणि जगात नाव कमावत आहेत. शरद विवेक सागर यांना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम द्वारे 2024 चा यंग ग्लोबल लीडर म्हणून घोषित करण्यात आले आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या यंग ग्लोबल लीडर म्हणून निवडलेला सागर हा बिहारमधील पहिला नेता आणि भारतातील सर्वात तरुण नेता आहे. सामाजिक उपक्रम क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल शरद यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
advertisement
शरद हे मूळचे भारताचे पहिले राष्ट्रपती, देशरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे जन्मस्थान असलेल्या जीरादेई येथील संजलपूर गावातील रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव विमलकांत प्रसाद असे आहे. 125 देशांतील 10 हजारांहून अधिक तरुणांमधून शरद यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. भारतातून निवडलेल्या चार तरुणांमध्ये शरद विवेक सागर यांचाही समावेश आहे. 32 वर्षीय शरद यांनी युनायटेड नेशन्समध्ये युवा राजदूत म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
advertisement
हा पुरस्कार मिळाल्यानंतर शरद हे जगातील शक्तिशाली राजकारणी आणि उद्योगपतींच्या ऐतिहासिक लीगमध्ये सामील झाले आहेत. सागर यांच्या आधी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, जर्मनीच्या माजी चान्सलर अँजेला मर्केल, न्यूझीलंडच्या माजी पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न, गुगल, फेसबुक आणि अलिबाबाच्या संस्थापकांसह इतर प्रभावशाली जागतिक नेते आणि उद्योगपतींनाही हा पुरस्कार मिळाला आहे.
advertisement
advertisement


