Success Story: ती दिसायला इतकी सुंदर की बॉलिवूडची हिरोईन फेल, पण आहे IPS अधिकारी!

Last Updated:
भारतात अनेक सरकारी अधिकारी आहेत जे बॉलिवूडच्या हिरो-हिरोईन्सपेक्षा सुंदर दिसतात. आज अशाच एका महिला IPS बद्दल जाणून घेऊ या
1/6
भारतात अनेक सरकारी अधिकारी आहेत जे बॉलिवूडच्या हिरो-हिरोईन्सपेक्षा सुंदर दिसतात. आज अशाच एका महिला IPS बद्दल जाणून घेऊ या. ही अधिकारी 'ब्यूटी विथ ब्रेन' म्हणून ओळखली जाते. तिचं नाव आशना चौधरी असून, ती सौंदर्याच्या बाबतीत मॉडेल्सशीही स्पर्धा करते. उत्तर प्रदेशमधल्या हापुड जिल्ह्यातल्या पिलखुवा इथली आशना सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. तिचे इन्स्टाग्रामवर 2 लाख 64 हजार फॉलोअर्स आहेत.

advertisement
2/6
आशनाच्या कुटुंबात आहेत प्रोफेसर -आशनाच्या आयुष्यातला एक मंत्र म्हणजे 'तुम्हाला जे हवं आहे, त्यासाठी तुम्ही रात्रंदिवस प्रामाणिकपणे कष्ट घेतले पाहिजेत. मेहनत केली, तरंच तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकाल.' यामुळेच आशना आज आयपीएस झाली आहे. आशना एका सुशिक्षित, संपन्न कुटुंबातली आहे. तिच्या कुटुंबात अनेक प्राध्यापक आहेत. त्यामुळे सर्वांना वाटत होतं, की आशना पीएचडी वगैरे करील; पण आशनाचे विचार मात्र या सगळ्यांपेक्षा वेगळे होते.

3/6
अधिकारी बनण्याचं स्वप्न -तिचे वडील सरकारी नोकरीत होते. त्यामुळे घरात अधिकाऱ्यांबद्दल बोलणं व्हायचं. ते ऐकून आशना सिव्हिल सर्व्हिसेसकडे आकर्षित झाली आणि तिने ऑफिसर व्हायचं ठरवलं.

4/6
आशनाचं शिक्षण -
आशनाने गाझियाबादच्या दिल्ली पब्लिक स्कूलमधून शिक्षण घेतलं. मग लेडी श्री राम कॉलेजमधून इंग्रजी लिटरेचरमध्ये ऑनर्स केल्यानंतर तिने साउथ एशियन युनिव्हर्सिटीमधून इंटरनॅशनल रिलेशन्स या विषयामध्ये मास्टर केलं. यादरम्यान तिने अनेक परीक्षा दिल्या होत्या. जोश टॉक्सने तिला अॅनालिस्ट पदासाठी रिजेक्ट केलं होतं; पण निराश न होता ती मेहनत करत राहिली.
आशनाचं शिक्षण - आशनाने गाझियाबादच्या दिल्ली पब्लिक स्कूलमधून शिक्षण घेतलं. मग लेडी श्री राम कॉलेजमधून इंग्रजी लिटरेचरमध्ये ऑनर्स केल्यानंतर तिने साउथ एशियन युनिव्हर्सिटीमधून इंटरनॅशनल रिलेशन्स या विषयामध्ये मास्टर केलं. यादरम्यान तिने अनेक परीक्षा दिल्या होत्या. जोश टॉक्सने तिला अॅनालिस्ट पदासाठी रिजेक्ट केलं होतं; पण निराश न होता ती मेहनत करत राहिली.
advertisement
5/6
रोज 8-9 तास अभ्यास करायची आशनामास्टर्सनंतर तिने एक वर्षाचा ब्रेक घेतला आणि यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. ती 8-9 तास सतत अभ्यास करायची. ती आधीच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका वाचायची आणि टायमर लावून सोडवायची. पहिल्या दोन प्रयत्नांत तिला अपयश आलं; पण तिने हार न मानता अभ्यास सुरू ठेवला आणि तिसऱ्या प्रयत्नात 116वी रँक मिळवून पास झाली.

6/6
प्रयत्न केल्याने मिळतं यश - आशना -जोपर्यंत तुमच्यात हिंमत आहे तोपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न सोडू नका. कारण जे प्रयत्न करतात ते कधीही हरत नाहीत, असं आशना म्हणते. आशना खूप स्टायलिश आहे. ती अनेक सोशल इव्हेंटमध्ये सहभागी होते. शिक्षण घेत असताना ती एका एनजीओमध्ये मुलांना शिकवत होती. तिच्या सकारात्मक विचारांमुळे ती तिच्या मित्रपरिवारात लाडकी आहे. ती खूप चित्रपट पाहते आणि तिला प्रवासाचीही आवड आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement