Success Story: 10वी-12वी मध्ये 60%, UPSC मध्ये 3 वेळा नापास, 4 तास अभ्यास, सामान्य विद्यार्थी झाला IAS

Last Updated:
Junaid Ahmad IAS Success Story: यूपीएससी परीक्षेत यशस्वी होण्यासाठी लहानपणापासून टॉपर असणे आवश्यक नाही. घोकमपट्टीचा तिथे उपयोग नाही. अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत, ज्यात सरासरी विद्यार्थीही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS/IPS अधिकारी झाले आहेत.
1/5
Junaid Ahmad IAS Success Story: अनेक शाळा आणि पालक लहानपणापासूनच मुलांवर अभ्यास आणि करिअरबाबत दबाव टाकू लागतात. जर मार्क चांगले असतील तर यश मिळेल अन्यथा तुम्हाला सामान्य विद्यार्थी म्हटलं जाईल ही गोष्ट मुलांच्या मनात बिंबवली जाते. पण ही धारणा पूर्णपणे चुकीची आहे. समाजात अनेक सरासरी विद्यार्थ्यांची उदाहरणे आहेत, ज्यांचे करिअर टॉपर्सपेक्षा चांगले आहे. उत्तर प्रदेश कॅडरचे आयएएस जुनैद अहमद हे देखील त्यापैकीच एक. (फोटो स्रोत: इंस्टाग्राम/ जुनैद अहमद)

advertisement
2/5
Junaid Ahmad IAS Biography: जुनैद अहमद हे उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील नगीना शहरातील रहिवासी आहेत. त्यांचे वडील जावेद हुसेन वकील आहेत आणि आई आयशा रझा गृहिणी आहेत. जुनैद सुरुवातीपासूनच अभ्यासात सरासरी होता. 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेत त्याचे गुण 60 टक्के होते. नोएडा येथील शारदा विद्यापीठातून त्यांनी बी. टेक. केलं. त्यातही त्याला जेमतेम 65 टक्के गुण मिळाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. (फोटो स्रोत: इंस्टाग्राम/ जुनैद अहमद)

3/5
Junaid Ahmad UPSC: जुनैदचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते, पण हे वाटतं तितकं सोपं नव्हतं. सरासरी विद्यार्थी असल्याने त्याला खूप कष्ट करावे लागले. त्याने यूपीएससी फ्री कोचिंग म्हणजेच जामिया रेसिडेन्शिअल कोचिंग अकादमीमध्ये प्रवेश घेतला होता. तो रोज 8-9 तास अभ्यास करू लागला. मात्र, असे असूनही त्यांच्या इच्छेप्रमाणे निकाल लागला नाही. तो UPSC परीक्षेत तीन वेळा नापास झाला. पण त्याने हार मानली नाही, प्रयत्न करत राहायचं असंच त्यांनी ठरवलं होतं. (फोटो स्रोत: इंस्टाग्राम/ जुनैद अहमद)

4/5
Junaid Ahmad IAS Motivational Story: जुनैद अहमद यूपीएससी परीक्षेच्या चौथ्या प्रयत्नात यशस्वी झाला. यामध्ये 352 व्या क्रमांकासह त्यांना भारतीय महसूल सेवेत सरकारी नोकरीची ऑफर मिळाली. पण त्यांना आयएएस अधिकारी व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा यूपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. आता त्यांचे बेसिक पूर्णपणे स्पष्ट झालं होतं. त्यामुळे त्यांनी त्यांचा अभ्यासाचा वेळ (UPSC Exam Strategy) कमी केला. त्यांनी आयआरएस प्रशिक्षणासोबत 4 तास अभ्यास सुरू केला. (फोटो स्रोत: इंस्टाग्राम/ जुनैद अहमद)

5/5
Junaid Ahmad IAS Instagram: एकेकाळी सरासरी विद्यार्थी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुनैद अहमदने यूपीएससी परीक्षेच्या पाचव्या प्रयत्नात मेहनत घेतली. याचा परिणाम असा झाला की 2018 मध्ये झालेल्या UPSC परीक्षेत तो तिसरा क्रमांक घेऊन टॉपर बनला. 2019 मध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, तो आयएएस अधिकारी बनला. जुनैद अहमद या सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर 3 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. सध्या ते उत्तर प्रदेशातील झाशी शहरात पोस्टेड आहेत. (फोटो स्रोत: इंस्टाग्राम/ जुनैद अहमद)

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement