Gadchiroli News : जहाल नक्षलवाद्याला हैदराबादमधून अटक, गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई

Last Updated:

खून, चकमक, जाळपोळ अशा गंभीर गुन्ह्यांत आरोपी असलेल्या जहाल नक्षलवाद्याला गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकाने तेलंगणातील हैदराबाद शहरातून अटक केली.

jahal naxalite
jahal naxalite
Gadchiroli News : खून, चकमक, जाळपोळ अशा गंभीर गुन्ह्यांत आरोपी असलेल्या जहाल नक्षलवाद्याला गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकाने तेलंगणातील हैदराबाद शहरातून अटक केली. शंकर ऊर्फ अरुण येर्रा मिच्चा (25 रा.बांदेपारा, ता.भोपालपट्टनम.जि.बिजापूर, छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या जहाल माओवाद्याचे नाव आहे. या आरोपीवर दोन राज्यात ळून पाच लाखांचे बक्षीस होते.तसेच त्याच्यावर एका हत्येसह चार गुन्हे दाखल आहेत.
छत्तीसगडचा रहिवासी असलेला शंकर ऊर्फ अरुण 2018 साली माओवादी चळवळीत दाखल झाला होता. 2022 नंतर तो गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय झाला.तसेच 2024 पर्यंत तो पेरमीली दलमध्ये कार्यरत होता. गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांच्या विरोधात मोहीम अधिक तीव्र केल्याने घाबरलेल्या शंकरने भूमिगत राहून काही काळ शेती केली नंतर हैदराबाद येथे कामगार म्हणून राहू लागला.दरम्यान शंकरवर एका हत्येसह पोलिसांवर हल्ल्याचे चकमकीचे त्याच्यावर चार गुन्हे दाखल आहेत.
advertisement
दरम्यान ‘सी-६०’ पथकाच्या जवानांनी सापळा रचून 4 सप्टेंबरला हैदराबाद येथून शंकरला अटक केली होती.त्यावेळी चौकशी दरम्यान त्याने हत्येची कबूली दिली हती. तसेच पोलिसांनी त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करीत त्याला न्यायालयात हजर केले होते. त्यामुळे न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

चकमकीत चार माओवादी ठार

छत्तीसगडच्या सीमेलगत असलेल्या कोपर्शी जंगलात गडचिरोली पोलिस आणि माओवादी यांच्यात झालेल्या चकमकीत चार माओवादी ठार झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये एक पुरुष आणि तीन महिला माओवादींचा समावेश असून घटनास्थळावर त्यांचे मृतदेह सापडले आहेत. या कारवाईत पोलिसांना मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही मिळाला आहे.
advertisement
गडचिरोली जिल्ह्यातील सी-६० (C-60) या विशेष पथकाला गुप्त माहितीच्या आधारे जंगल परिसरात शोधमोहिम राबवण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान माओवादी दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला आणि दोन्ही बाजूंमध्ये काही वेळ चकमक रंगली. या कारवाईत चार माओवादी ठार पडले असून, उर्वरित माओवादी जंगलात लपून बसल्याचा अंदाज आहे. सध्या त्या भागात पावसामुळे अडथळे निर्माण होत असले तरी जवानांची शोधमोहिम सुरू आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Gadchiroli News : जहाल नक्षलवाद्याला हैदराबादमधून अटक, गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement