दादाच्या शाळेने मुलांना मिळाला आधार, रस्त्यावरच्या विद्यार्थ्यांचा होतोय फायदा PHOTOS
- Published by:News18 Marathi
Last Updated:
रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना नेहमीच जाताना येताना सर्व जण हे पाहत असतात. या मुलांच्या शिक्षणासाठी चार वर्ष झालं दादाची शाळा सुरु करण्यात आली आहे.
रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना नेहमीच जाताना येताना सर्व जण हे पाहत असतात. पण यांच्या शिक्षणाच काय ते शाळेत जातात का? असाच प्रश्न पडला<a href="https://news18marathi.com/pune/"> पुण्यात</a> राहणाऱ्या अभिजित पोखरनिकर या तरुणाला आणि या तरुणाने मित्राच्या मदतीने दादाची शाळा सुरु केली. या शाळेमुळे सिग्नल, रस्त्यावर, वस्तीवर राहणारी मुलं शिक्षणाचे धडे गिरवू लागली. गेली चार वर्ष झालं ही शाळा शहरातील उपनगर भागात मुलांना शिकवत आहे.
advertisement
दादाची शाळा अभिजित पोखरणीकर याने त्याचा मित्र शुभम माने यांच्या मदतीने सुरु केलीली आहे. या शाळेबद्दल माहिती देताना अभिजित पोखरणीकर याने सांगितले की, दादाची शाळा ही चार वर्षा पूर्वी स्थापन केली. ही शाळा पूर्णपणे शिक्षणावर काम करते. रस्त्यावर, सिग्नलवर किंवा वाड्या पाड्यामध्ये जाताना मलं दिसतात आणि आपण त्यांना सतत पाहत असतो.
advertisement
तर एक विचार यायचा की या मुलांच्या शिक्षणासाठी कोण काय करतं? त्यामुळे शुभम आणि मी बसून विचार केला की आपण यावर काम करू शकतो. त्यामुळे जीवनात त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी मदत होईल. त्यामुळे आम्ही सिग्नल, रस्त्यावर राहणारी, वाड्या वास्त्यावर राहणारी मुलं जी शिक्षणापासून वंचित आहेत ती शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून दादाची शाळा सुरु केली.
advertisement
जी मुलं सिग्नल, रस्त्यावर वर राहतात त्यांना रस्त्याच्या कडेला शिकवणे. तसेच वाड्या वस्त्यावर राहणारी मुलं आहेत जी शिक्षणाच्या प्रवाहात नाही येत त्यांना त्या प्रवाहात आणून त्याने शिकवणे, कागदपत्रे तयार करणे, सरकारी योजनाचा लाभ त्यांना मिळून देणे या सर्व गोष्टी दादाच्या शाळेच्या माध्यमातून आम्ही करतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


