15 सरकारी नोकऱ्या सोडणारी तरुणी आज IPS, महिला दिनानिमित्ताने वाचा 'या' महिलांची motivational story

Last Updated:
International Women's Day: आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस. उत्तराखंड राज्यातील अल्मोडा येथील काही महिला अशा आहेत ज्या आज विविध क्षेत्रात आज संपूर्ण उत्तराखंडला अभिमानास्पद वाटेल, अशी कामगिरी करत आहेत. यामध्ये भारतीय महिला क्रिकेटपटू एकता बिष्ट, IAS अधिकारी सौम्या गुरुराणी, IPS अधिकारी तृप्ती भट्ट, रूप दुर्गापाल आणि मनोरम जोशी यांचा समावेश आहे. (रोहित भट्ट, प्रतिनिधी)
1/6
अल्मोडा येथील रहिवासी असलेल्या IRS अधिकारी श्रद्धा जोशी या आज संपूर्ण देशाला परिचित आहेत. 12वी नापास हा चित्रपट ज्यांच्यावर आधारित आहेत, त्या श्रद्धा जोशी यांनी बारावीचे शिक्षण अल्मोडा येथून घेतले आणि 12 वीमध्ये त्यांचा 13 वी रँक आली होती. त्या बालपणापासूनच हुशार विद्यार्थिनी होत्या. 2007 मध्ये त्यांनी यूपीएससीची परीक्षा पास करत आयआरएस रँक मिळवली. त्या सध्या मुंबईत सेवेत आहेत.

advertisement
2/6
अल्मोडा येथील रहिवासी आयपीएस तृप्ती भट्ट लहानपणापासूनच वाचन आणि लेखनात हुशार होत्या. आयपीएस होण्यापूर्वी त्यांनी इस्रोची नोकरी आणि जवळपास 15 इतर नोकऱ्या नाकारल्या. 2013 च्या बॅचच्या IPS तृप्ती पहिल्याच प्रयत्नात 165 व्या रँकसह IPS अधिकारी बनल्या. सध्या तृप्ती या डेहराडून एसपी इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी या पदावर आहेत. त्या प्रत्येकासाठी प्रेरणास्त्रोत आहेत.

3/6
अल्मोडा येथील रहिवासी असलेल्या रूप दुर्गापालने आपल्या अभिनयाने छोट्या पडद्यावर चांगली कामगिरी करत सर्वांच्या मनावर राज्य केले आहे. आज रूप दुर्गापाल ही टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने बालिका वधूमध्ये सांचीची भूमिका साकारली होती आणि 15 हून अधिक मालिका नाटकांमध्ये काम केले आहे आणि आता ती वेब सीरिजमध्येही दिसणार आहे.

4/6
अल्मोडा येथे राहणाऱ्या सौम्या गुरुरानी ही लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार विद्यार्थिनी आहेत. 2016 च्या यूपीएससी परीक्षेत त्यांनी 148 रँक मिळवली आणि त्या IPS ट्रेनिंगसाठी हैदराबादला गेल्या होत्या. पण त्यासोबतच त्यांनी पुन्हा UPSC परीक्षा दिली आणि त्यांना ऑल इंडियात 30 वी रँक मिळाली. सौम्या आजच्या प्रत्येक तरुण पिढीसाठी प्रेरणास्त्रोत आहे. सौम्या सध्या हरदोई येथे मुख्य विकास अधिकारी म्हणून तैनात आहे.

5/6
आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू एकता बिष्टला हिला आज संपूर्ण भारत ओळखतो. तिने आपल्या फिरकी गोलंदाजीने अनेक मोठ्या फलंदाजांना बाद केले. एकता एका सामान्य कुटुंबातील आहे. तिने वयाच्या 6व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केली. एकताच्या नावावर अनेक मोठे विक्रम नोंदवले गेले आहेत. टी-20 सामन्यात हॅट्ट्रिक घेणारी एकता ही पहिली गोलंदाज आहे.

6/6
अल्मोडा येथील मनोरमा जोशी यांनी दिव्यांग मुलांसाठी आपले आयुष्य समर्पित केले आहे. 81 वर्षीय मनोरमा जोशी यांनी 1 जुलै 1998 रोजी मंगलदीप विद्या मंदिराची स्थापना केली आणि त्यांचा उद्देश दिव्यांग मुलांना आधार देणे आणि त्यांना एक योग्य मार्ग दाखवणे हे होते. अवघ्या सहा मुलांपासून त्यांनी ही शाळा सुरू केली, आज 30 हून अधिक मुले येथे शिकत आहेत. मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांना उपजीविकेशी जोडण्याचे कामही येथे केले जात आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement