17 वर्षांच्या मुलाचे तुकडे केले, शीर दुकानात पुरलं, 2 वर्ष त्याच्याच घरी जेवला; मौलानाने 'दृश्यम' स्टाईल केला मर्डर

Last Updated:
तब्बल ४ वर्ष त्याने कुणालाच कळू दिलं नाही की आपणच खून केला. दृश्यम सिनेमाला लाजवेल अशी घटना भिवंडीत घडली. (नरेंद्र पाटील, प्रतिनिधी)
1/8
दुकानात काम करणाऱ्या एका १७ वर्षांच्या मुलाची हत्या करतो, त्यानंतर मृतदेहाची विल्वेवाट लावण्यासाठी तुकडे करून फेकून देतो आणि काही तुकडे हे दुकानामध्येच पुरता. एवढं करूनही तो बांग देणारा मौलाना हा मयताच्या कुटुंबीयांसमोर वावरत होता. तब्बल ४ वर्ष त्याने कुणालाच कळू दिलं नाही की आपणच खून केला. दृश्यम सिनेमाला लाजवेल अशी घटना भिवंडीत घडली. अखेरीस पोलिसांनी या मौलानाला अटक केली आहे.

advertisement
2/8
नवीबस्ती नेहरूनगर परिसरातील शोएब शेख हा 17 वर्षीय युवक 20 नोव्हेंबर 2020 रोजी बेपत्ता झाला होता. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

3/8
दरम्यान स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात राहणारा मदरशाचा मौलवी गुलाम रब्बानी याने शोएब शेख याची हत्या केल्याचा संशय व्यक्त केल्याने भिवंडी शहर पोलिसांनी 2023 मध्ये मौलाना गुलाम रब्बानी याला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणलं होतं. परंतु त्यावेळी पोलीस ठाण्यात झालेल्या गर्दीचा फायदा घेत पोलीस ठाण्यातून मौलाना फरार झाला होता. तेव्हा पासून पोलीस त्याच्या मागावर होते.

4/8
पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो उत्तरप्रदेशमध्ये पळून गेल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन त्याला अटक केली आणि भिवंडीत घेऊन आले.

5/8
ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घार्गे यांच्या पथकाला आरोपी गुलाम रब्बानी याच्या बाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आरोपीस अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यानेच शोएब शेख याची हत्या केल्याचं कबूल केलं.  एवढंच नाहीतर मृतदेहाचा काही भाग रस्त्यालगतच्या कचऱ्यात तुकडे करून फेकून दिला होता, असंही त्याने सांगितलं.  तर शोएबचं शिर आणि  मृतदेहाचे काही भाग दुकानात गाडून ठेवले, असल्याचं सांगितलं.

6/8
 शोएब बेपत्ता झाल्यापासून दोन वर्ष आरोपी गुलाम रब्बानी हा आमच्याच परिसरात राहत होता. आमच्या संपर्कात होता पण त्याने कधी ही आपण हत्या केल्याची कुणकुण लागू दिली नाही. पोलिसांनी संशयावरून 2023 मध्ये आरोपीस चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पण त्यावेळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गुलाम रब्बानी पळून जाऊन फरार झाला होता. आपल्या निष्पाप मुलाची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीस कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी मयत शोएबच्या आईने केली आहे.

7/8
पोलिसांनी भिवंडी शहरातील नवीबस्ती नेहरूनगर परिसरातील दुकानात हत्या करून मृतदेहाचे काही अवशेष दुकानातून ताब्यात घेतले आहे.

8/8
शोएब हा गुलाम रब्बानी याच्या दुकानामध्ये काम करत होता. शोएबला गुलामबद्दल काही तरी माहिती कळाली होती, त्यामुळे त्याने शोएबचा खून केला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. ठाणे गुन्हा शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या पोलिसांनी मारेकरी मौलवीला  अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement