Lilavati Hospital: मानवी हाडं, काळी बाहुल्या आणि 8 कलश, लीलावती हॉस्पिटलमधील त्या केबिनचे पहिले PHOTOS
- Published by:sachin Salve
Last Updated:
ज्या ठिकाणी मानवी हाडं आणि काळी जादू साहित्य सापडलं. त्या जागेचे फोटो आता समोर आले आहे.
: देशातील प्रख्यात लीलावती हॉस्पीटलच्या चेअरमन केबिनमध्ये काळी जादू केल्याचा प्रकार समोर आला आहे. काळ्या जादूसाठी वापरलेलं साहित्य सापडल्यानं मोठी खळबळ माजली आहे. या कॅबिनची फ्लोरिंग खोदल्यानंतर चक्क हाडं आणि काळे केस भरलेले 8 हंडे सापडले आहेत. सापडलेली हाडं मानवी असल्याचा धक्कादायक खुलासा आता समोर आलाय.
advertisement
लीलावती हॉस्पिटल या मुंबईच्या प्रख्यात हॉस्पिटलमध्ये ब्लॅक मॅजिक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासेल अशी ही घटना. अगदी उच्चशिक्षित आणि वैद्यानिक लोकांनी ही ब्लॅक मॅजिक केली असल्याचा आरोप केला जातोय. लीलावतीचे कार्यकारी संचालक आणि माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी न्यूज१८ लोकमतशी संवाद साधला तेव्हा त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पण हा सगळा प्रकार एका घोटाळ्यासोबत जुळत आहे. लीलावती कीर्ती लाल मेहता मेडिकल ट्रस्टच्या संस्थापक किशोरी मेहता 2002 मध्ये आजारी पडल्या आणि उपचारासाठी परदेशात गेल्या. या काळात त्यांचे भाऊ विजय मेहता यांनी ट्रस्टची तात्पुरती जबाबदारी घेतली. विजय मेहता यांनी बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या मुलाला आणि पुतण्यांना विश्वस्त बनवले आणि किशोरी मेहता यांना कायमस्वरूपी विश्वस्त पदावरून काढून टाकल्याचा आरोप आहे. हा खटला 2016 पर्यंत चालला, जेव्हा किशोरी मेहता पुन्हा तिचे पद स्वीकारू शकल्या. 2024 मध्ये किशोरी मेहता यांच्या निधनानंतर, त्यांचा मुलगा प्रशांत मेहता ट्रस्टचे कायमचे विश्वस्त बनले यानंतर त्यांना संस्थेमध्ये आर्थिक अनियमितता आढळून आली.
advertisement
मेफेअर रिअल्टर्स आणि वेस्टा इंडियामध्ये गुंतवलेल्या 11.52 कोटी रुपयांच्या फसवणूक आणि गैरव्यवहारासाठी पहिला एफआयआर नोंदवण्यात आला. कायदेशीर शुल्काच्या स्वरूपात 44 कोटी रुपयांच्या फसवणुकीसाठी दुसरा एफआयआर दाखल करण्यात आला, परंतु कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. तिसऱ्या एफआयआरमध्ये 1200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या रुग्णालय साहित्याच्या खरेदीत अंतर्गत ऑडिटमध्ये अनियमितता आढळून आली.
advertisement