ज्याच्यासाठी वडिल विनोद खन्नांनी कुटुंब-करिअर सगळंच सोडलं, अक्षय खन्ना त्या ओशोला मानतो का?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Akshaye Khanna : अभिनेता अक्षय खन्नाचे वडिल विनोद खन्ना यांनी ओशोसाठी करिअर आणि कुटुंब पणाला लावलं. वडिलांप्रमाणे अक्षय खन्ना देखील ओशोंना मानतो काय?
अभिनेते विनोद खन्ना यांनी करिअर यसाच्या शिखरावर असताना संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय वैयक्तिक आयुष्यालाच नाही तर त्यांच्या मुलांनाही मोठा धक्का देऊन गेला. विनोद खन्ना हे ओशो आश्रमात गेले तेव्हा अभिनेता अक्षय खन्ना तेव्हा फक्त 5 वर्षांचा होता. या वयात वडिलांनी अचानक सोडून जाणं त्याच्यासाठी खूप धक्कादायक होतं.
advertisement
advertisement
advertisement
अक्षय खन्ना त्याच्या फिल्मी करिअरमध्ये तितकाचा यशस्वी झाला नाही. वयाच्या पन्नाशीत त्यानं बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक केलं आणि आपली नवी ओळख निर्माण केली. अक्षय खन्नाने अजूनही लग्न केलं नाही. वयाच्या पन्नाशीत तो एकट्यानं आयुष्य जगतोय. इतक्या वर्षात कोणत्या अभिनेत्रीबरोबर त्याच्या अफेअरचीही चर्चा पाहायला मिळाली नाही.
advertisement
advertisement
advertisement







