advertisement

काहीजण अशा प्रसंगी कोसळतात तर काहीजण...! सुनेत्रा पवारांबाबत 'कोकण हार्टेड गर्ल'ची पोस्ट

Last Updated:
Ankita Walawalkar On Sunetra Pawar : अजित पवारांच्या मृत्यूनंतर लगेचच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना ट्रोल करण्यात आलं. आता अंकिता वालावकरनेही याबाबत पोस्ट केली आहे.
1/5
अजित पवार यांचा प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न पडला होता. अखेर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचीच उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. 31 जानेवारीला त्यांचा शपथविधी झाला.

2/5
28 जानेवारीला अजित पवारांचा मृत्यू आणि 31 जानेवारीला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ म्हणून सुनेत्रा पवार यांना काही लोकांनी ट्रोलही केलं. यातच आता बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावलकरचीही पोस्ट चर्चेत आली आहे. तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत आपलं मत मांडलं. 

3/5
अंकिता वालावलकर म्हणाली, सुनेत्रा पवार यांनी शपथ घेणं म्हणजे दुःख नाकारणं नव्हे. कधी कधी जबाबदारी स्वीकारणं हेच दुःखावर उत्तर असतं. काहीजण अशा प्रसंगी कोसळतात तर काहीजण अधिक ठामपणे उभे राहतात. दोन्ही मार्ग मानवीच आहेत
अंकिता वालावलकर म्हणाली, सुनेत्रा पवार यांनी शपथ घेणं म्हणजे दुःख नाकारणं नव्हे. कधी कधी जबाबदारी स्वीकारणं हेच दुःखावर उत्तर असतं. काहीजण अशा प्रसंगी कोसळतात तर काहीजण अधिक ठामपणे उभे राहतात. दोन्ही मार्ग मानवीच आहेत"
advertisement
4/5
 "सोशल मीडियावर ट्रोल करणं खूप सोप्प असतं. पण समोरची व्यक्ती काय अनुभवते आहे, तिच्या मनात काय चालू आहे हे आपण जाणत नाही", असं सुनेत्रा पवारांना ट्रोल करणाऱ्यांना तिने उत्तर दिलं आहे.

5/5
 "संवेदनशीलता आणि समजूतदारपणा या गोष्टी आजच्या काळात फार गरजेचे आहेत. राजकारणात टीका होणारच, प्रश्न विचारले जाणारच पण व्यक्तिगत दुःखावर उपहार करणं हे आपल्याच समाजाचं प्रतिबिंब दाखवतं. विचार वेगळे असू शकतात, मतभेद असू शकतात पण माणूसपण टिकवणं हीच खरी गरज आहे", असं ती म्हणाली.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement