Dua's Nickname : दीपिका-रणवीरने दाखवला लेकीचा चेहरा, आता लाडक्या मावशीने सांगितलं दुआचं क्यूट निकनेम

Last Updated:
Dua's Nickname : दुआचे फोटो व्हायरल होताच तिच्या क्युटनेसवर चाहते फिदा झाले, पण याच वेळी दीपिकाची बहीण आणि दुआची मावशी अनीशा पादुकोणने दुआचे क्यूट निकनेम सांगितलं आहे.
1/10
मुंबई: बॉलिवूडचे सर्वात लोकप्रिय आणि स्टायलिश कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी यंदाच्या दिवाळीत त्यांची कन्या दुआ पादुकोण सिंग हिचा चेहरा सर्वांना दाखवून चाहत्यांना अक्षरशः आनंदाचा डबल डोस दिला.

advertisement
2/10
दुआचे फोटो व्हायरल होताच तिच्या क्युटनेसवर चाहते फिदा झाले, पण याच वेळी दीपिकाची बहीण आणि दुआची मावशी अनीशा पादुकोण हिच्या एका कमेंटने सगळ्यांचे लक्ष वेधले आणि दुआचे लाडके निकनेम उघड झाले.

3/10
मंगळवारी जेव्हा दीपिका आणि रणवीरने इंस्टाग्रामवर दुआचे पहिले फोटो शेअर केले, तेव्हा इंटरनेटवर आनंदाची लाट उसळली.

4/10
फोटोंमध्ये दुआ लाल रंगाच्या आउटफिटमध्ये, हुबेहूब आई दीपिकासारखी म्हणजेच दिसत होती. एका खास फोटोत दुआ गोंडस हसताना आणि तिचे छोटे बोट तोंडात असताना खूपच गोड दिसत होती.

5/10
आलिया भट्ट, कतरिना कैफ आणि प्रियंका चोप्रासह अनेक कलाकारांनी या पोस्टवर प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव केला.

6/10
या सगळ्या कमेंटमध्ये दुआची लाडकी मावशी अनीशा पादुकोणची कमेंट सर्वात खास ठरली. तिने आपल्या लाडक्या भाचीवरील प्रेम व्यक्त करताना लिहिले,
या सगळ्या कमेंटमध्ये दुआची लाडकी मावशी अनीशा पादुकोणची कमेंट सर्वात खास ठरली. तिने आपल्या लाडक्या भाचीवरील प्रेम व्यक्त करताना लिहिले, "माझ्या हृदयाचा हा छोटासा तुकडा, माझी टिंगू!"
advertisement
7/10
'टिंगू' हे निकनेम चाहत्यांना इतकं आवडलं की, दुआच्या फोटोसोबत आता तिचं हे क्युट निकनेम सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका चाहत्याने 'दुआ'ला 'नवीन पार्ले जी गर्ल' अशी उपमा दिली.

8/10
फोटोंमध्ये रणवीर, दीपिका आणि दुआ तिघेही पारंपरिक पोशाखात खूप सुंदर दिसत होते. रणवीर क्रीम रंगाच्या एथनिक आउटफिटमध्ये दीपिका आणि दुआला प्रेमाने जवळ घेत होता.

9/10
दीपिका आणि दुआने सुप्रसिद्ध डिझायनर सब्यासाचीने डिझाइन केलेले लाल रंगाचे शाही पारंपरिक पोशाख परिधान केले होते. दीपिका एका पूर्ण बाह्यांच्या लांब कुर्त्यामध्ये, त्यावर बारीक सोन्याची जर-जरदोरीची नक्षी असलेल्या डिझाइनमध्ये खूप सुंदर दिसत होती.

10/10
दीपिका आणि रणवीरने ८ सप्टेंबर २०२४ रोजी मुलीचे स्वागत केले होते आणि गेल्या दिवाळीला त्यांनी 'दुआ' असे तिचे नामकरण केले होते. कामाबद्दल बोलायचं झाल्यास, दीपिका नुकतीच 'सिंघम अगेन'मध्ये दिसली, तर रणवीर लवकरच आदित्य धरच्या 'धुरंधर'मध्ये झळकणार आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement