Nikki Tamboli : भांडखोर निक्की तांबोळीने सांगितली मरणानंतरची इच्छा, म्हणाली 'देवाने मला असंच...'

Last Updated:
Nikki Tamboli : निक्की खऱ्या आयुष्यात कशी आहे? आता याबद्दल खुद्द निक्कीनेच मोठा खुलासा केला आहे. तिने तिच्या मृत्युनंतरची इच्छा व्यक्त केली आहे!
1/9
निक्की तांबोळीने 'बिग बॉस'च्या घरातून लोकांच्या मनात घर केलं. आजवर ती अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिसली आहे. त्या सर्व स्पर्धा ती किती गांभीर्याने घेते, हे सगळ्यांनीच पाहिलं आहे. बिग बॉस, खतरों के खिलाडी अशा शो मध्ये तिचा आक्रमक अंदाज आपण पाहिलाच आहे.

advertisement
2/9
नुकत्याच 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मध्येही तिचा तोच अंदाज दिसला. काही लोकांना ती 'सेल्फिश' देखील वाटते. निक्की म्हणजे मोठ्या आवाजात बोलणारी, भांडखोर अशी तिची इमेज लोकांच्या मनात तयार झाली आहे. पण निक्की खऱ्या आयुष्यात कशी आहे? आता याबद्दल खुद्द निक्कीनेच मोठा खुलासा केला आहे.

3/9
पिंकविलाला दिलेल्या एका मुलाखतीत निक्कीने तिच्या मृत्युनंतरची इच्छा व्यक्त केली आहे! ऐकून थोडं वेगळं वाटेल, पण तिला एक खूप चांगलं काम करायचं आहे. निक्कीचं म्हणणं आहे की तिला लोकांसाठी काहीतरी करायचं आहे.

4/9
ती म्हणाली, "मी स्वतःची मतं इतक्या ठामपणे देते की माझे घरचे आणि मित्र म्हणतात, 'अगं, हे 'बिग बॉस' नाही चाललंय!' प्रॉब्लेम हा आहे की मला बोलायला आणि माझी मतं मांडणं खूप महत्त्वाचं वाटतं."

5/9
निक्की पुढे म्हणाली, "कोणासोबत काहीतरी चुकीचं होत असेल, तर मी नक्की आवाज उठवते. माझा आवाज कधीकधी खूप मोठा होतो, पण याचा अर्थ असा नाही की मी रागवत आहे किंवा वाईट बोलत आहे. देवाने मला असंच बनवलं आहे की मला वाटतं माझ्याशिवाय सगळे खुश राहावेत." त्यानंतर निक्कीने एक असा खुलासा केला आहे, ज्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही.

6/9
ती म्हणाली, "लोकं मानणार नाहीत, पण मी हे सुद्धा ठरवलं आहे की जेव्हा मी मरेन, तेव्हा माझे सगळे बॉडी ऑर्गन्स दान केले जातील. मला स्वतःसाठी काहीच करायचं नाहीये, कारण जेव्हा मी या जगातून कायमची जाईन, तेव्हा काही सोबत घेऊन नाही जाणार."

7/9
निक्कीचं असं म्हणणं आहे की कधीकधी तिला तिचं हे रूप दाखवायला भीती वाटते, कारण मग लोक म्हणतील की ती बिग बॉसमध्ये काहीतरी वेगळी होती आणि इथे काहीतरी वेगळी आहे. पण, या मुलाखतीत निक्कीने हेही सांगितलं की ती बराच दानधर्म देखील करते.

8/9
तिने सांगितलं की तिच्या ड्रायव्हरच्या मुलाला क्रिकेटमध्ये पुढे जाण्यासाठी मदत करण्याची तिची इच्छा आहे. त्याचबरोबर ती तिच्या घरात काम करणाऱ्या लोकांसाठीही काही ना काही करत असते.

9/9
'बिग बॉस'मध्ये दिसणारी बेधडक निक्की आणि खऱ्या आयुष्यात सगळ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा ठेवणारी निक्की पाहिल्यानंतर आता तिच्या 'सेल्फिश' इमेजला नक्कीच धक्का बसेल.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement