Video : ऑक्सिजन मशीन फेल, डॉक्टरने फुंकले स्वतःचे प्राण; आपला श्वास देऊन नवजात बाळाला जीवनदान
- Published by:Priya Lad
Last Updated:
Doctor Saved Newborn Baby Life : जीवनमृत्यू कुणाच्या हातात नाही पण देवरूपी डॉक्टर कित्येक रुग्णांना मृत्यूच्या दारातून खेचून आणतात आणि नवं जीवनदान देतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
जीवन आणि मृत्यू कुणाच्या हातात नाही. पण डॉक्टर ज्यांना देव मानलं जातं कारण ते कित्येक रुग्णाना मृत्यूच्या दारातून परत आणतात. डॉक्टरांना देव म्हणतात ते उगाच नाही. हेच दाखवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हॉस्पिटलमधील ऑक्सिजन मशीन फेल ठरली पण एका डॉक्टरने आपला श्वास देऊन एका नवजात बाळाला जीवनदान दिलं आहे.
एक महिला डॉक्टर जिने नवजात बाळाचा जीव वाचवला आहे. जन्मानंतर या बाळाच्या शरीरात काहीच हालचाल नव्हती. मृतावस्थेतच ते होतं. माहितीनुसार रुग्णालयातील ऑक्सिजन मशीन फेल झाली. पण डॉक्टरने आशा सोडली नाही. तिने बाळाला जिवंत करण्यासाठी धडपड केली. त्याच्या पाठीवर थापा मारल्या, तोंडाने फुंक मारली आणि अखेर तिच्या प्रयत्नांना यश आलंच. शेवटी चमत्कार झालाच. बाळाच्या शरीराची हालचाल झाली. बाळ जिवंत झालं. मृतावस्थेत जन्मलेल्या बाळाला डॉक्टरांनी फुंक मारून काही मिनिटांत जिवंत केलं आहे.
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने डॉक्टरची बाळाला वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. बाळाच्या तोंडात तोंड घालून ती फुंक मारते. जणू आपले प्राण ती त्याच्यात फुंकते. जवळपास 7 मिनिटं ती असं करते. अखेर बाळ जिवंत होतं आणि त्या डॉक्टरकडे पाहून गोड हसू लागतं. हे दृश्य म्हणजे मनाला स्पर्श करणारं असं आहे.
advertisement
डॉक्टरने केलेली ही प्रक्रिया म्हणजे सीपीआर आहे. याला माउथ टू माउथ रेस्पिरेशन म्हणतात. या पद्धतीने डॉक्टरने बाळाला श्वास घेण्यासाठी मदत केली. त्याच्या पाठीवर चोळून त्याला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या बाळाचे प्राण वाचले.
जब सिस्टम ने साथ छोड़ दिया और मशीनें खामोश हो गईं,
तब आगरा की डॉ. सुलेखा चौधरी ने अपनी साँसों से एक नवजात को ज़िंदगी दी सरकारी अस्पताल में ऑक्सीजन फेल होने पर 7 मिनट तक मुंह से ऑक्सीजन देकर बच्चे की जान बचाना यह इलाज नहीं, इंसानियत का सबसे ऊँचा इलाज है।
डॉ. सुलेखा चौधरी सिर्फ… pic.twitter.com/Nqiisp1k8o
— Shama Parveen (@ShamaParveen70) December 26, 2025
advertisement
सोशल वर्कर शमा परवीन यांनी आपल्या @ShamaParveen70 या एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार या महिला डॉक्टरचं नाव सुलेखा चौधरी आहे. हे दृश्य आग्रातील सरकारी रुग्णालयातील आहे. ही केस जुनी आहे पण त्याचा व्हिडीओ आता पुन्हा व्हायरल होतो आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
Dec 27, 2025 10:08 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Video : ऑक्सिजन मशीन फेल, डॉक्टरने फुंकले स्वतःचे प्राण; आपला श्वास देऊन नवजात बाळाला जीवनदान











