Hardik Pandya : नो लूक शॉट पाहिले असतील पण पांड्याची No Look Wicket पाहिली का? स्टंप कॅमेऱ्याचा Video तुफान व्हायरल
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Hardik Pandya No Look Wicket Video : साहिबजादा फरहानने एक मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॅटचा संपर्क नीट न झाल्याने बॉल मिड-ऑनच्या दिशेने हवेत गेला, जिथे रिंकू सिंगने एक सोपा कॅच पकडला.
Hardik Pandya Viral Video : भारताचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या सध्या त्याच्या जबरदस्त फॉर्ममुळे चर्चेत आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये हार्दिकने आपल्या बॉलिंगने सर्वांना थक्क केले. त्याने 3 ओव्हरमध्ये केवळ 16 रन्स देऊन 2 महत्त्वाचे विकेट्स काढले. या कामगिरीदरम्यान त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान गाजत आहे, ज्यामध्ये पांड्याने साहिबजादा फरहानची विकेट घेतल्यावर आपला खास स्वॅग दाखवला.
मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न अन्...
ही घटना पाकिस्तानच्या डावातील पहिल्याच ओव्हरमध्ये घडली, जेव्हा हार्दिकने टीम इंडियासाठी बॉलिंगची सुरुवात केली. ओव्हरच्या चौथ्या बॉलवर पाकिस्तानचा ओपनर साहिबजादा फरहानने एक मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॅटचा संपर्क नीट न झाल्याने बॉल मिड-ऑनच्या दिशेने हवेत गेला, जिथे रिंकू सिंगने एक सोपा कॅच पकडला. यामुळे पाकिस्तानला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला आणि त्यांची लय बिघडली.
advertisement
Hardik Pandya is a legend for a reason
After bowling 3 dot balls for 4th one he dint even bother to see who is catching the ball because after that he knew
Sahibzada Farhan is OUT
Brand Vs Cheap product #INDvsPAK pic.twitter.com/3DEsl7uMFQ
— Sheetal Chopra (@SheetalPronamo) February 16, 2026
advertisement
विशेष म्हणजे, हार्दिक पंड्याला फरहानचा शॉट पाहताच तो आऊट होणार याची खात्री पटली होती. त्याने बॉल फिल्डरच्या हातात जाण्याची वाटही पाहिली नाही, तर थेट बॅट्समनच्या डोळ्यात डोळे घालून त्याला खुन्नस दिली. त्याने शांतपणे चालत बॅट्समनकडे पाहत आपला आनंद साजरा केला, ज्याला नेटकरी 'नो लुक विकेट' असे म्हणत आहेत. हार्दिकचा हा बोल्ड अॅटिट्युड पाहून भारतीय चाहते खुश झाले आहेत.
advertisement
दरम्यान, साहिबजादा फरहान हा तोच खेळाडू आहे ज्याच्यावर पाकिस्तानमध्ये 'Hero in The Making' नावाची डॉक्युमेंट्री बनवण्यात आली आहे. या फिल्ममध्ये त्याने 2025 च्या आशिया कपमध्ये जसप्रीत बुमराहला मारलेल्या दोन सिक्सरचे खूप कौतुक करण्यात आलं होतं. मात्र, टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारतासमोर तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. अवघ्या 4 बॉलवर 0 रन्स करून तो माघारी परतला. पाकिस्तान त्याच्यावर 32 तासांची फिल्म बनवणार होते. पण फरहान शुन्यावर गेल्याने फिल्मचा सेट अप गुंडाळण्यात आलाय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 12:01 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Hardik Pandya : नो लूक शॉट पाहिले असतील पण पांड्याची No Look Wicket पाहिली का? स्टंप कॅमेऱ्याचा Video तुफान व्हायरल







