प्रॅक्टीकलसाठी तळ्याजवळ गेले; आधी विद्यार्थी मग शास्त्रज्ञानं गमावला जीव, बारामतीत काय घडलं?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
आपल्या सहकाऱ्याला पाण्यात बुडताना पाहून तिथे असलेल्या एका विद्यार्थिनीने मदतीसाठी आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून जवळच असलेले शास्त्रज्ञ बी. गोपालकृष्णन यांनी क्षणाचाही विलंब न लावता हरिप्रसादला वाचवण्यासाठी तळ्यात उडी घेतली.
पुणे : बारामती तालुक्यातील माळेगाव येथील 'राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेत' (NIASM) एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पाण्यात बुडून एका शास्त्रज्ञासह विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी संस्थेच्या परिसरातील एका तळ्यामध्ये ही घटना घडली. बी. गोपालकृष्णन असे मृत शास्त्रज्ञाचे नाव आहे. तर, के. एस. हरिप्रसाद असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
एका विद्यार्थ्याचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात कर्तव्यदक्ष शिक्षकालाही आपले प्राण गमवावे लागल्याने संपूर्ण शैक्षणिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, के. एस. हरिप्रसाद हा विद्यार्थी आपल्या शैक्षणिक प्रात्यक्षिकासाठी आवश्यक पाण्याचे नमुने घेण्यासाठी तळ्याच्या काठावर गेला होता. पाण्याचे नमुने घेण्याच्या गडबडीत त्याचा अचानक पाय घसरला आणि तो खोल पाण्यात पडला.
advertisement
आपल्या सहकाऱ्याला पाण्यात बुडताना पाहून तिथे असलेल्या एका विद्यार्थिनीने मदतीसाठी आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून जवळच असलेले शास्त्रज्ञ बी. गोपालकृष्णन यांनी क्षणाचाही विलंब न लावता हरिप्रसादला वाचवण्यासाठी तळ्यात उडी घेतली. दुर्दैवाने पाण्याचा अंदाज न आल्याने आणि बचावाचे प्रयत्न अपयशी ठरल्याने दोघेही पाण्यात बुडाले.
advertisement
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तातडीने शोधमोहीम राबवून दोघांनाही बाहेर काढण्यात आले आणि पोलीस व्हॅनमधून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. एका विद्यार्थ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या या शास्त्रज्ञाच्या शौर्याची आणि या दुर्दैवी अपघाताची चर्चा आता सर्वत्र होत असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 10:17 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
प्रॅक्टीकलसाठी तळ्याजवळ गेले; आधी विद्यार्थी मग शास्त्रज्ञानं गमावला जीव, बारामतीत काय घडलं?











