2 तास 29 मिनिटांच्या या मर्डर-मिस्ट्रीचा नेटफ्लिक्सवर धुमाकूळ, रिलीज होताच केलाय OTT वर कब्जा
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Netflix Crime Thriller : नेटफ्लिक्सवर नवाजुद्दीन सिद्दीकी यांची नवीन मर्डर मिस्ट्री रिलीज झाली आहे. यामध्ये संपूर्ण बंसल कुटुंबातील सदस्यांची एकाच वेळी हत्या करण्यात येते. कथा इतकी जबरदस्त आहे की क्लायमॅक्स पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील.
Netflix Crime Triller : नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांसाठी एकाहून एक उत्तम फिल्म आणि वेब सीरिज उपलब्ध आहेत. पण आज आपण ज्या मर्डर मिस्ट्रीबद्दल बोलत आहोत, तिची कथा आणि कलाकारांची निवड इतकी दमदार आहे की शेवटपर्यंत तुम्ही मारेकऱ्याचा चेहरा पाहण्याची उत्सुकता धरून ठेवता. या मर्डर मिस्ट्री चित्रपटाचा पहिल्याच सीनपासून सस्पेन्स सुरू होतो, जो प्रेक्षकांना शेवटपर्यंत कथेशी बांधून ठेवतो. कथानक इतके गुंतागुंतीचे आहे की पुढच्या सीनचा अंदाजही तुम्ही लावू शकत नाही.
नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या नव्या मर्डर मिस्ट्री ‘रात अकेली है: द बंसल मर्डर्स’ने ओटीटीप्रेमींना वेड लावलं आहे. सोशल मीडियावरदेखील या सीरिजला चांगले रिव्ह्यू मिळत आहेत. तुम्हालाही जर मर्डर मिस्ट्री चित्रपट पाहण्याची आवड असेल, तर नेटफ्लिक्सवरील ‘रात अकेली है: द बंसल मर्डर्स’ नक्की पाहा. या चित्रपटातील प्रत्येक सीन इतका प्रभावी आणि थरारक आहे की तुम्ही क्षणभरही नजर हटवू शकणार नाही. चित्रपटाची कथा एका कुटुंबातील 6 सदस्यांच्या हत्येने सुरू होते आणि त्यानंतर एकामागून एक धक्कादायक ट्विस्ट्स येत राहतात, जे पाहून तुमची झोप उडेल. एकदा हा चित्रपट पाहायला सुरुवात केली की क्लायमॅक्सपर्यंत उठावेसे वाटणार नाही. बंसल कुटुंबाच्या हत्येनंतर, इंस्पेक्टर जतिल यादव यांना लालच, फसवणूक आणि रहस्यांचे जाळे सापडते, जे एका घातक कटाकडे घेऊन जाते.
advertisement
नेटफ्लिक्सवर करतेय ट्रेंड
2025 मध्ये रिलीज होताच ‘रात अकेली है’ ने टॉप 10 मध्ये स्थान मिळवले असून तो सध्या नंबर 1 वर ट्रेंड करत आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत चित्रांगदा सिंह, राधिका आप्टे, रेवती, दीप्ती नवल, ईशा अरुण, संजय कपूर आणि रजत कपूर यांसारखे कलाकार दिसतात. ज्यांनी आपापल्या भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारल्या आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट कोणत्याही सत्य घटनेवर आधारित नाही. नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा ‘रात अकेली है: द बंसल मर्डर्स’ हा चित्रपट 19 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.
advertisement
मर्डर मिस्ट्रीची स्टोरी करतेय प्रेक्षकांच्या मनावर राज्य
view comments‘रात अकेली है: द बंसल मर्डर्स’ ची कथा स्मिता सिंह यांनी लिहिली असून दिग्दर्शन हनी त्रेहान यांनी केले आहे. या चित्रपटाला IMDB वर 6.9 रेटिंग मिळाली असली, तरी प्रेक्षकांना हा चित्रपट खूपच आवडत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या चित्रपटाचा पहिला भाग ‘रात अकेली है’ 2020 मध्ये आला होता आणि तब्बल 5 वर्षांनंतर दुसरा भाग ‘रात अकेली है: द बंसल मर्डर्स’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 10:01 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
2 तास 29 मिनिटांच्या या मर्डर-मिस्ट्रीचा नेटफ्लिक्सवर धुमाकूळ, रिलीज होताच केलाय OTT वर कब्जा










