Solapur: डोकं तापेल एवढं ऊन, डोळ्यासमोर अंधार, LPG च्या रांगेत उभं राहिलेल्या तरुणाला भोवळ
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सोलापूरात ई केवायसीसाठी गॅस रांगा, कुमठा नाक्यावर असमद रफिक शेख बेशुद्ध, साई राम गॅस एजन्सीवर सोमनाथ धनुरेची दगडफेक, महिला जखमी, पोलिसात गुन्हा
प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर: सोलापूर शहरात सध्या घरगुती गॅस मिळवण्यासाठी आणि ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहेत. उन्हाचा पारा चाळीशी पार गेलेला असताना तासनतास रांगेत उभं राहावं लागत असल्यानं लोक हैराण झाले आहेत. आज कुमठा नाका परिसरात गॅससाठी रांगेत उभे असताना असमद रफिक शेख या तरुणाला कडक उन्हामुळे चक्कर आली आणि तो जागीच कोसळला. डोळ्यासमोर अंधारी आल्याने असमद खाली पडताच तिथे उपस्थित नागरिकांनी त्याला तातडीने मदत केली.
डोक्यावर ऊन आणि तासनतास उभं राहून पाय दुखले. उन्हात गॅससाठी उभं राहिलेल्या तरुणाला अचानक भोवळ आली. गॅससाठी उन्हात उभारल्यानंतर तरुणाला चक्क आली. त्यानंतर आजूबाजूच्यांनी त्याला पाणी देऊन, शुद्धीवर आणलं. सोलापुरातल्या कुमठा नाका परिसरातील गॅस एजन्सी समोरील घटना घडली. असमद रफिक शेख असे भोवळ आलेल्या तरुणाचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. गॅस सिलिंडरबाबत ग्रामीण भागात परिस्थिती बिकट होत असल्याचं दिवसेंदिवस पाहायला मिळत आहे.
advertisement
केवायसीचा अडथळा आणि सर्व्हरचा खोळंबा
केवळ ऊनच नाही, तर गॅस एजन्सींकडून दिली जाणारी कारणं नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत आहेत. "सर्व्हर डाऊन आहे," "वेळ संपली आहे," अशा उत्तरांमुळे तासनतास रांगेत उभा असलेला ग्राहक वैतागून जात आहे. या त्रासाचा कडेलोट आज जुने विडी घरकुल परिसरातील **'साई राम गॅस एजन्सी'**वर पाहायला मिळाला.
advertisement
एजन्सीवर दगडफेक, महिला ग्राहक जखमी
ई-केवायसी होत नसल्याने संतप्त झालेल्या सोमनाथ धनुरे नावाच्या ग्राहकाचा एजन्सी चालकांशी जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, सोमनाथने रागाच्या भरात एजन्सीवर दगडफेक केली. दुर्दैवाने, त्याने मारलेला दगड तिथेच रांगेत उभ्या असलेल्या एका महिला ग्राहकाच्या डोक्याला लागला, ज्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.
advertisement
पोलीस कारवाई आणि वाढता संताप
दगडफेक करणाऱ्या सोमनाथ धनुरे याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनांमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. उन्हाची तीव्रता पाहता गॅस एजन्सींनी सावलीची किंवा टोकन पद्धतीची व्यवस्था का केली नाही? आणि वारंवार सर्व्हर डाऊन का होतोय? असा संतप्त सवाल सोलापूरकर विचारत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 01, 2026 1:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur: डोकं तापेल एवढं ऊन, डोळ्यासमोर अंधार, LPG च्या रांगेत उभं राहिलेल्या तरुणाला भोवळ








