Kalyan News : रिक्षा बाजूला घेण्याच्या वादातून तरुणाला मारहाण अन् आईसोबत...; कल्याण हादरले!
Last Updated:
Kalyan : कल्याणच्या आनंदवाडीत रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याच्या रागातून एका तरुणावर 7 ते 8 जणांनी लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. या घटनेत नवाज गंभीर जखमी झाला असून कोळसेवाडी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
कल्याण : कल्याण शहरात रस्ता अडवणाऱ्या रिक्षाला बाजूला घेण्यास सांगितल्याने एका तरुणावर काही जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात पीडित नवाज शेख हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
केवळ 'रिक्षा बाजूला घ्या' म्हणणे पडले महागात
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कल्याण पूर्व भागातील आनंदवाडी परिसरातील आहे. जिथं नवाज शेख हा तरुण दररोज प्रमाणे आपल्या कामासाठी जात असताना रस्त्यात एक रिक्षा उभी होती. त्यामुळे रस्त्या अडवला गेला होता. नवाजने रिक्षाचालकाला ती रिक्षा बाजूला घेण्याची विनंती केली. पण ही केलेली विनंती रिक्षा चालक आणि त्याच्या सोबत असलेल्या साथीदारांना इतकी जिव्हारी लागली की त्यांनी नवाज सोबत भांडण करण्यास सुरुवात केली.
advertisement
पाहता पाहता या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या रिक्षाचालकाने आणि त्याच्यासोबत असलेल्यांनी नवाजला बेदम मारहाण केली. फक्त हातापायानेच नाही तर लोखंडी रॉड आणि रस्त्यावर असलेल्या पेव्हर ब्लॉकने त्याच्यावर वार केले. धक्कादायक गोष्ट म्हणजे नवाजच्या आईला जीवे मारण्याचीही धमकी दिली. नवाजला गेलेल्या हाणामारीमुळे त्याच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 01, 2026 1:00 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan News : रिक्षा बाजूला घेण्याच्या वादातून तरुणाला मारहाण अन् आईसोबत...; कल्याण हादरले!








