दमदार सिनेमांचे सिक्वेल, 'धर्मवीर 2' की 'नवरा माझा नवसाचा 2' , पहिल्या दिवशी कोण ठरलं कोणावर भारी?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
dharmaveer 2 day one box office collection : सप्टेंबर महिन्यात मराठीतील दोन बहुप्रतिक्षित सिनेमांचे सिक्वेल रिलीज झालेत. 'धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे' च्या यशानंतर 'धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' हा सिनेमा रिलीज झाला आहे. त्याआधी नवरा माझा नवसाचा 2 हा सिनेमा रिलीज झाला. या दोन्ही सिनेमांनी ओपनिंग डेच्या कमाईत एकमेकांना टक्कर दिली आहे. काय आहे धर्मवीर 2 ची पहिल्या दिवसाची कमाई ?
ठाण्याचा ढाण्या वाघ धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे' हा सिनेमा 2022 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला.
advertisement
'धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे'च्या यशानंतर 'धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' प्रेक्षकांची भेटीला आली.
advertisement
आनंद दिघे यांच्या वेशात प्रमुख भुमिकेत अभिनेता प्रसाद ओक आहे. हा सिनेमा 27 सप्टेंबर 2024 साली रिलीज झाला.
advertisement
सिनेमा पाहण्यासाठी पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी थिएटर हाऊसफुल केल्याचं पाहायला मिळालं. सिनेमानं ओपनिंग डेला 1.92 कोटींची कमाई केली आहे.
advertisement
advertisement
बरोबर एक आठवड्यांआधी सचिन पिळगावकर दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा 2 हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमानं पहिल्या दिवशी 2.2 कोटींची कमाई केली.
advertisement
सप्टेंबर महिन्यात बहुप्रतिक्षित दोन मराठी सिनेमांचे सिक्वेल रिलीज झालेत. दोन्ही सिनेमांचे विषय वेगळे होते. दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असला तरी नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमानं धर्मवीर 2 या सिनेमाला पहिल्याच दिवशी काहींच्या फरकाने टक्कर दिली आहे.
advertisement