Disha Patani: 2 महागडी घरं ते 6 लग्झरी गाड्या; बोल्डनेस क्वीन दिशा पाटनी आहे इतक्या कोटींची मालकीण!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Disha Patani networth: बॉलिवूडमध्ये स्टारडम मिळवणं सोपं नाही. पण उत्तर प्रदेशातील बरेलीतून आलेली दिशा पाटणी आज त्या थोडक्याच अभिनेत्रींपैकी एक आहे, जिचं नाव केवळ चित्रपटांसाठीच नव्हे तर तिच्या स्टाईल, फिटनेस आणि लक्झरी लाईफस्टाईलसाठीही घेतलं जातं.
advertisement
advertisement
दिशाने 2015 मध्ये तेलुगू चित्रपट लोफरमधून सुरुवात केली. त्यानंतर एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी ने तिच्या करिअरला मोठं वळण दिलं. बागी 2, मलंग, भारत, राधे आणि एक व्हिलन रिटर्न्स सारख्या चित्रपटांनी तिचा प्रवास पुढे नेला. अभिनयासोबतच दिशा मॉडेलिंग, ब्रँड एंडोर्समेंट आणि सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे.
advertisement
advertisement
advertisement
दिशाची स्टाईल सेन्सही चाहत्यांमध्ये चर्चेत असते. शॅनेल, लुई व्हिटॉन सारख्या ब्रँडच्या बॅग्ज आणि कपडे तिला पापाराझींच्या यादीत कायम ठेवतात. आर्थिक बाबतीत पाहिलं तर दिशाची एकूण संपत्ती 2024 मध्ये सुमारे 75 ते 100 कोटी इतकी होती. ती वर्षाला अंदाजे 12 कोटी कमावते आणि महिन्याला सुमारे 1 कोटींचं उत्पन्न मिळवते.
advertisement