प्रसिद्ध अभिनेत्रीला यायचे आयुष्य संपवण्याचे विचार, इतक्या वर्षांनी सांगितली 'ती' भयावह स्टोरी
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीने पहिल्यांदाच आयुष्यात आलेलं नैराश्य, एकटेपणा आणि आत्महत्येचा विचार याबाबत मोकळेपणाने भाष्य केलं आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्री पार्वती थिरुवोथु (Parvathy Thiruvothu) सध्या 'द मेल फेमिनिस्ट'च्या पॉडकास्टमुळे चर्चेत आहे. या पॉडकास्टमध्ये अभिनेत्रीने आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. यात आयुष्यात आलेलं नैराश्य, एकटेपणा ते आत्महत्या करुन आयुष्य संपवण्याचा करत असलेला विचार याबाबत तिने मोकळेपणाने भाष्य केलं आहे.
advertisement
पार्वती थिरुवोथु राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री आहे. पण काही कारणाने मानसिक संतुलन बिघडल्याने अभिनेत्रीला थेरपीचा आधार घ्यावा लागला. अभिनेत्री दीर्घ काळापासून एकटीपणाची शिकार झाली आहे. पण या ट्रॉमामधून बाहेर पडताना तिला एखादा चांगला थेरेपिस्ट मात्र मिळाला नाही. अभिनेत्रीने नुकतंच याबाबत खुलासा केला आहे.
advertisement
लैंगिक अत्याचाराचा सामना केलेल्या पार्वतीने डिप्रेशनची झुंज दिली आहे. पण या घटनांचा तिच्या आयुष्यावर खोल परिणाम झाला आहे. पार्वती थिरुवोथु पॉडकास्टमध्ये म्हणाली,"मी लहान असताना माझ्या वडिलांसोबत रेल्वे स्टेशनवर जात होते. अचानक समोरुन एक माणूस आला आणि त्याने माझ्या छातीवर खूप जोरात हात मारला. त्यावेळी मी आतून पूर्णपणे घाबरुन गेले. कधी सार्वजनिक ठिकाणी एखाद्या अनोळखी व्यक्तीने मला त्याचा प्रायव्हेट पार्ट दाखवला आहे तर कधी जवळच्या व्यक्तीनेच चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आहे. या सगळ्या घटनांचा माझ्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. मी डिप्रेशनमध्ये गेले. इतकेच नाही तर आत्महत्येचे विचारही मनात येऊ लागले. मला असे वाटू लागले की माझी मदत करणारे कोणीच नाही".
advertisement
थेरपीबाबत बोलताना पार्वती म्हणते,"एक चांगला थेरेपिस्ट मिळण्यासाठी मला मोठा संघर्ष करावा लागला. मला एका सर्वसामान्स व्यक्तीप्रमाणे ट्रिट करेल असा थेरेपिस्ट मला नको होता. माझा पहिला थेरेपिस्ट अमेरिकेत राहायचा. त्याचे सेशन्स रात्री 1-2 वाजता व्हायचे. आपल्या देशातील थेरेपिस्ट प्रकरण खूप वेगळ्या पद्धतीने हाताळतात हे खूप भयावह आहे".
advertisement
advertisement
advertisement









