5 महिन्यांपूर्वी 'मृत्यू'; सासरच्यांवर हत्येचा गुन्हा, पण ती अचानक पुण्यात फिरताना दिसली? धक्कादायक सत्य समोर

Last Updated:

ज्या सुनेच्या हत्येच्या आरोपाखाली सासरच्या मंडळींवर 'हुंडाबळी'चा गुन्हा दाखल झाला होता, तीच सून तब्बल ५ महिन्यांनी पुण्यामध्ये जिवंत सापडली आहे.

पुण्यात सापडली 'मृत' महिला (AI Image)
पुण्यात सापडली 'मृत' महिला (AI Image)
पुणे : एक अतिशय धक्कादायक आणि चित्रपट कथेला साजेसा प्रकार पुण्यात नुकताच समोर आला आहे. ज्या सुनेच्या हत्येच्या आरोपाखाली सासरच्या मंडळींवर 'हुंडाबळी'चा गुन्हा दाखल झाला होता, तीच सून तब्बल ५ महिन्यांनी पुण्यामध्ये जिवंत सापडली आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासन आणि न्यायव्यवस्थेत मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
उत्तर प्रदेसमधील श्रावस्ती येथील लक्ष्मणपूर गंगापूरची रहिवासी असलेल्या दीपाचा विवाह ओरीपुरवा येथील हंसराज याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी दीपा बेपत्ता झाली. ऑगस्ट २०२५ पासून तिचा कोणताही पत्ता लागत नव्हता. बराच शोध घेऊनही ती न सापडल्याने, दीपाच्या माहेरच्या मंडळींनी सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा खळबळजनक आरोप केला.
advertisement
न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल: सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती. मात्र दीपाच्या आई-वडिलांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर दीपाचा पती हंसराज, सासरा परमेश्वर आणि सासू यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला. या गंभीर प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला.
पुण्यातील लोकेशनने फिरवली तपासाची चक्रे: तपास अधिकारी सतीश शर्मा यांनी दीपाच्या मोबाईल क्रमांकाचा तांत्रिक डेटा तपासला असता, तिचे लोकेशन महाराष्ट्रातील पुणे शहरात असल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुण्यात धाड टाकून दीपाला ताब्यात घेतले.
advertisement
दीपाने पोलिसांना दिलेल्या जबाबात धक्कादायक खुलासा केला. तिने सांगितले की, कोणाच्याही दबावाखाली न येता ती स्वतःच्या मर्जीने घर सोडून पुण्यात आली होती आणि तिथेच राहत होती. आता पोलिसांनी दीपाला ताब्यात घेऊन श्रावस्तीत नेले असून तिला न्यायालयात हजर केले जाणार आहे. तिच्या जबाबानंतर सासरच्या मंडळींवर लावण्यात आलेले हत्येचे कलम काढले जाणार की त्यांना इतर काही कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागणार, हे स्पष्ट होईल. मात्र, एका जिवंत व्यक्तीच्या हत्येचा गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाची सर्वत्र चर्चा होत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
5 महिन्यांपूर्वी 'मृत्यू'; सासरच्यांवर हत्येचा गुन्हा, पण ती अचानक पुण्यात फिरताना दिसली? धक्कादायक सत्य समोर
Next Article
advertisement
BJP Congress Alliance : पुन्हा भूकंपाचे संकेत! भाजप-काँग्रेस युतीच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ, कुठं जुळणार समीकरण?
पुन्हा भूकंपाचे संकेत! भाजप-काँग्रेस युतीच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ, कुठं
  • काही दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेसच्या युतीमुळे मोठी खळबळ उडाली होती.

  • आता पुन्हा एकदा भाजप काँग्रेसची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

  • काँग्रेस किंग मेकरच्या भूमिकेत असल्याने आज मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

View All
advertisement