8 एपिसोडची ही हॉरर सीरिज, झोप उडवणारा प्रत्येक सीन, चुकूनही एकट्यानं पाहू नका
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
OTT Horror Web Series : ओटीटी प्लॅटफॉर्मवरील एक 8 एपिसोडची हॉरर सीरिज चुकूनही एकट्यानं पाहण्याची हिंमत करू नका. झोप उडवणारा प्रत्येक सीन असणाऱ्या या सीरिजची सध्या चर्चा आहे.
advertisement
advertisement
'अंधेरा' असं या वेब सीरिजचं नाव आहे. ही साधी हॉरर सीरिज नसून एक स्लो-बर्न सुपरनॅचरल थ्रिलर असणारी सीरिज आहे. जी मुंबईसारख्या झगमगाटी महानगराच्या मागे लपलेल्या अंधाऱ्या सत्याला समोर आणते. या सीरिजची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे तिचं वातावरण. अनेक प्रेक्षकांनी या सीरिजला शांतपणे पण खोलवर परिणाम करणारी, दीर्घकाळ लक्षात राहणारी हॉरर सीरिज म्हटलं आहे.
advertisement
'अंधेरा'ची कथा मुंबई शहराभोवती फिरते. जिथे एक रहस्यमय आणि अलौकिक शक्ती लोकांना आपला बळी बनवत आहे. या भयानक सत्याचा सामना करण्यासाठी समोर येतात एक निडर पोलिस निरीक्षक आणि मानसिकदृष्ट्या त्रस्त वैद्यकीय विद्यार्थी. या दोघांचं आयुष्य एका बेपत्ता मुलीच्या प्रकरणामुळे एकमेकांशी जोडलं जातं, जे हळूहळू एका मोठ्या आणि भीषण सत्याकडे इशारा करतं. कथा पुढे जात असताना ती फक्त भूत-प्रेत किंवा अलौकिक घटनांपुरती मर्यादित राहत नाही, तर नैराश्य, ट्रॉमा, भीती आणि माणसाच्या कमकुवतपणासारख्या संवेदनशील विषयांनाही स्पर्श करते.
advertisement
advertisement
'अंधेरा' या सीरिजची निर्मिती गौरव देसाई यांनी केली असून दिग्दर्शनाची धुरा राघव दार यांनी सांभाळली आहे. या सीरिजमध्ये प्रिया बापट एका दमदार पोलिस निरीक्षकाच्या भूमिकेत दिसते. तर करणवीर मल्होत्रा मानसिकदृष्ट्या गुंतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्याची भूमिका साकारतो. याशिवाय प्राजक्ता कोळी आणि सुरवीन चावला देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतात. सहाय्यक कलाकारांमध्ये वत्सल शेठ, परवीन डबास आणि प्रणय पचौरी यांसारखे कलाकार आहेत.
advertisement
'अंधेरा' या सीरिजमध्ये शहरी हॉरर आणि सायकोलॉजिकल थ्रिलचं मिश्रण आहे. यात वास्तव जीवनातील ट्रॉमा आणि मानसिक भीती अत्यंत प्रामाणिकपणे दाखवण्यात आली आहे. IMDb वर या सीरिजला 6.0 रेटिंग मिळाली असली, तरी प्रेक्षकांवर तिचा प्रभाव त्याहून खूप जास्त दिसून येतो. पहिल्या सीझननंतर आता प्रेक्षक दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. 2026 मध्ये या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.










