Vasant More : '...तर आमदारांना कात्रजचा घाट दाखवणार', वसंत मोरेंनी लेकाच्या प्रभागात ठोकला शड्डू! पाहा काय म्हणाले तात्या?

Last Updated:

Pune PMC Election Vasant More rally : पुण्याचे डॉशिंग नेते वसंत मोरे यांनी लेकाच्या प्रभागात शड्डू ठोकला. रुपेश मोरे हे प्रभाग क्रमांक 40 मधून उभे आहेत. तिथं एका कार्यक्रमात वसंत मोरे यांनी आमदारांना इशारा दिला.

Vasant More
Vasant More
Vasant More Warn MLA : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता प्रचाराचा जोर आणखी वाढल्याचं चित्र पहायला मिळत आहे. पुण्यात उद्धव ठाकरे गटाने आक्रमक प्रचार सुरू केला असून आता शिवसेनेची तोफ पुण्यात पोहोचली. शिवसेनाचा बुलंद आवाज असलेल्या संजय राऊतांची मुलखमैदानी तोफ कात्रजध्ये कडाडली. त्यावेळी पुण्याचे डॉशिंग नेते वसंत मोरे यांनी लेकाच्या प्रभागात शड्डू ठोकला. रुपेश मोरे हे प्रभाग क्रमांक 40 मधून उभे आहेत. तिथं एका कार्यक्रमात वसंत मोरे यांनी आमदारांना इशारा दिला.

काय म्हणाले वसंत मोरे?

गोर गरिबांना त्रास द्यायचा, मारामाऱ्या करायच्या... टिळेकर नगर किंवा डोंगरावरील नागरिकांना धमक्या द्यायच्या, असे प्रकार प्रभाग क्रमांक 40 मध्ये चालणार नाहीत, असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. माझी आमदारांना आणि त्यांच्या चिल्यापिल्यांना विनंती आहे. अशा धमक्या द्यायच्या भानगडीत तुम्ही पडू नका. कारण आम्ही कात्रजचा घाट दाखवणारी माणसं आहोत, असं म्हणत वसंत मोरेंनी निवडणुकीत शड्डू ठोकला आहे.
advertisement












View this post on Instagram























A post shared by



advertisement

आजिबात दमदाट्या करायच्या नाहीत

आम्ही उतरलो तर पूर्ण ताकदीने उतरतो. डोंगरावरच्या एका जरी घराला धक्का लागला, एकाच्या घराची भिंत जरी पडली, घराची वीट जरी पडली तर तुमचं या भागात काय काय पडल याचा हिशोब तुम्ही करत बसाल, अशा इशारा देखील वसंत मोरे यांनी केला दिला आहे. गरिबांना आजिबात दमदाट्या करायच्या नाहीत. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक लढतोय, असंही मोरे यावेळी म्हणाले.
advertisement

रुपेश मोरे निवडणुकीच्या रिंगणात

दरम्यान, पुणे महानगरपालिकेसाठी वसंत मोरे आणि त्यांचा मुलगा रुपेश मोरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून हे बाप लेक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कात्रजची मत हवीत पण विकास नको अशी टीका वसंत मोरे यांनी केली. मी ज्या पद्धतीनं काम करतो त्या पद्धतीनं मुलानं करावं अशी अपेक्षा वसंत मोरेंनी व्यक्त केली.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Vasant More : '...तर आमदारांना कात्रजचा घाट दाखवणार', वसंत मोरेंनी लेकाच्या प्रभागात ठोकला शड्डू! पाहा काय म्हणाले तात्या?
Next Article
advertisement
BJP vs Shiv Sena Ambernath : भाजपचा डाव फसला, शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक, अंबरनाथ नगर परिषदेत मोठी उलथापालथ, सगळा गेमच फिरला!
भाजपचा डाव फसला, शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक, गेमच फिरला अंबरनाथमध्ये उलथापाल
  • अंबरनाथ नगरपरिषदेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.

  • शिवसेना शिंदे गटाची अंबरनाथमधून सत्ता उलथवण्यासाठी भाजपने जंग पछाडलं.

  • शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे भाजप पुरता घायाळ

View All
advertisement