advertisement

आई-वडीलांचा डिवोर्स, स्वत:च केली लग्नाची बोलणी; गिरीजा-सुहृदची Filmy Love Story

Last Updated:
Girija Oak -Suhrud Godbole Love Story : आई- बाबांचा डिवोर्स झालेला असताना गिरीजानं स्वत:च तिच्या लग्नाची बोलणी केली होती. वयाच्या 22 व्या वर्षी गिरीजानं लग्न केलं. तिची लव्ह स्टोरी माहितीये का?
1/10
अभिनेत्री गिरिजा ओक हिनं मराठीच नाही तर हिंदी आणि गुजराती रंगभूमी, सिनेमा आणि मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेते गिरीश ओक यांची मुलगी असूनही आज गिरिजाची इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख आहे. गिरीजा ही गिरीश ओक यांची मुलगी आणि प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक, अभिनेते श्रीरंग गोडबोले यांची सून आहे. गिरीजा तिच्या मोकळ्या आणि स्पष्ट स्वभावामुळे कायमच प्रेक्षकांची लाडकी ठरली आहे. गिरीजाची लव्ह स्टोरी देखील तिच्यासारखीच झक्कास आहे.

2/10
द अनुरुप शोला दिलेल्या मुलाखतीत गिरीजानं तिची क्यूट लव्ह स्टोरी सांगितली. गिरीजानं सुह्रदय गोडबोलेशी 2011 साली लग्न केलं. दोघांचा एक मुलगा आहे. दोघांची पहिली भेट 2008 साली आदित्य सरपोतदारच्या साखरपुड्यात झाली होती. त्या साखरपुड्यात गिरीजा तिच्या बॉयफ्रेंडबरोबर आली होती असं तिच्या नवऱ्याने सांगितलं.

3/10
सुह्रत म्हणाला,
सुह्रत म्हणाला, "तेव्हा तारे जमीन पर चित्रपटाची अभिनेत्री म्हणून गिरीजा माहीत होती. पण त्या पार्टीत दोघांमध्ये काहीच असं बोलणं झालं नाही."
advertisement
4/10
गिरीजानं सांगितलं,
गिरीजानं सांगितलं, "पुढे काही दिवसांनी एका प्रोजेक्टसाठी मानधन, शूटिंगच्या वेळा असं सांगण्यासाठी सुहृदने फोन केला. तेव्हा कोणीतरी पन्नाशीतली व्यक्ती आपल्याशी बोलतेय असं वाटलं. या प्रोजेक्टचं शूटिंग गोव्याला होणार होतं तेव्हा या दोघांची प्रत्यक्षात भेट झाली. तेव्हा सुहृदकडे पाहून 'हा एवढासा मुलगा आपल्याशी फोनवर एवढं सगळं बोलला' असं मनात म्हणाले."
advertisement
5/10
गिरीजा पुढे म्हणाली,
गिरीजा पुढे म्हणाली, "आम्ही गोव्यात होतो. तिथे काही खरेदी करत होतो. आमच्या दोघांची गणिताची बोंब असल्याने आम्ही फोनमध्ये कॅल्कुलेट करत होतो. तेव्हा कळलं की आमची गणिताची बोंब आहे. तेव्हा आमचं ठरलं. आमच्या नावडी सेम आहेत."
advertisement
6/10
 "पुढे याच प्रोजेक्टमध्ये काम करत असताना अमेय गोसावी आणि दर्शना जोग या आम्हाला सुचवलं. दोघांनाही एकमेकांबद्दल विचारण्यास सांगितले तेव्हा 'यावर विचार करायला हरकत नाही' म्हणत आमचे सुर जुळले", असंही गिरीजानं सांगितलं.

7/10
गिरीजाचं लग्न ठरलं आणि साखरपुडा करायचा होता तेव्हा गिरीजाचे आईबाबा दोघेही वेगळे झाले होते, दोघांनीही त्यांचा नवीन संसार थाटला होता.

8/10
 गिरीजा म्हणाली,
गिरीजा म्हणाली, "माझे आणि बाबा वेगळे झाले होते.त्यांची दोन लग्न झाली होती आणि त्यांच्या दोन वेगळ्या फॅमिली होत्या. समोर चार गोडबोले होते इथे माझे वडील, त्यांची बायको, त्यांची मुलगी, बायकोच्या घरातील आणखी दोन मुलं. इथे माझी आई, तिचा नवरा, तिची दोन मुलं, तिचा भाचा असे माझ्याकडे खूप लोक होते."
advertisement
9/10
वडिलांचं आणि आईचं अशी दोन्ही बाजूने मोठी फॅमिली समोर होती त्यामुळे 'लग्नाची बोलणी कोण करणार?' असे होणाऱ्या सासुबाईंनी विचारल्यावर 'मीच करणार' म्हणून गिरीजाने साधेपणाने लग्न करायचं ठरवलं होतं.

10/10
'लग्नाला लागणारा खर्च आम्हाला द्या आम्ही युरोप ट्रिप करतो' असं तिचं म्हणणं होतं. त्यांना रजिस्टर लग्न करायचं होतं. पण गिरीजाच्या आईवडिलांना हे लग्न मोठं व्हावं अशी इच्छा होती. गिरीजाचे सासरे श्रीरंग गोडबोले यांनी तर ' तुम्ही पळून जाऊन लग्न करा म्हणजे कोणालाच खर्च नको!' असा मजेशीर सल्लाही दिला होता.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement