Indian Idol फेम सायली कांबळेने दिली Good News! लवकरच येणार गोंडस पाहुणा, पाहा डोहाळे जेवणाचे क्यूट PHOTO

Last Updated:
Sayli Kamble Baby Shower : इंडियन आयडल १२ फेम सायली कांबळे लवकरच आई होणार आहे. तिने सोशल मीडियावरून ही आनंदाची बातमी शेअर केला असून चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
1/8
मुंबई: ‘इंडियन आयडल १२’ या सिंगिंग शोमधून आपल्या आवाजाच्या जादूने महाराष्ट्रासह देशभरातील प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केलेली आपली लाडकी गायिका सायली कांबळे लवकरच एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.

advertisement
2/8
सायलीच्या घरी लवकरच एका छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. तिने स्वतःच डोहाळे जेवणाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे.

3/8
सायली कांबळेने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जे फोटो पोस्ट केले आहेत, त्यात ती पारंपरिक मराठमोळ्या वेशात दिसत आहे. हिरवीगार साडी, नाकात नथ आणि फुलांचे आकर्षक दागिने परिधान करून ती खूपच आनंदात दिसत आहे.

4/8
तिच्या चेहऱ्यावर मातृत्वचा ग्लो आणि आनंद स्पष्टपणे झळकत आहे. सोबतच, तिचा पती धवल देखील या क्षणांचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहे.

5/8
सायलीने हे फोटो शेअर करताना एक खूपच भावूक आणि प्रेमळ कॅप्शन लिहिलं आहे. तिने देवाचे आभार मानले असून, आयुष्यातील या सर्वात अविश्वसनीय प्रवासाला सुरुवात करत असल्याची माहिती दिली आहे.

6/8
तिने लिहिलं आहे की, “आमच्या मनात आनंद आणि उत्सुकता दाटून आली आहे. मी आणि धवल तुम्हाला हे सांगताना खूप उत्साहित आहोत की, आमचं छोटंसं बाळ लवकरच जगात येणार आहे. आम्ही आमच्या बाळाला भेटण्यासाठी आतुर आहोत. खूप सारं प्रेम घेऊन तो/ती आमच्या भेटीला येत आहे.”

7/8
तिच्या या पोस्टवर ‘इंडियन आयडल’मधील तिचे मित्र, सहकलाकार आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

8/8
गायनाच्या जोरावर सायलीने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. तिने २४ एप्रिल २०२२ रोजी प्रियकर धवलसोबत लग्न केलं होतं. आता लग्नाच्या तीन वर्षांनंतर ती आई होणार आहे, ज्यामुळे तिच्या आयुष्यातला हा नवीन टप्पा खूप खास असणार आहे.

Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement