'क्रांतिज्योती'ची मुले बॉक्स ऑफिसच्या परीक्षेत अव्वल! पहिल्याच विकेंडला बजेट वसूल, किती केली कमाई?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
हेमंत ढोमे दिग्दर्शिक 'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' या सिनेमानं 2026 वर्षात मराठी सिनेमांची दमदार सुरूवात केली आहे. सिनेमानं पहिल्याच आठवड्यात बजेट वसूल कमाई केली आहे.
2026 या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी 'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आहे. मराठी शाळेच्या अस्मितेला नवा आवाज देणार हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला आणि सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे. 'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' या सिनेमा अवघ्या एका आठड्यात दमदार कमाई केली आहे. सिनेमानं पहिल्या आठवड्यात बजेट वसूल केलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' हा सिनेमा सोशल मीडियावर व बुक माय शोवर चित्रपट ट्रेंडिंग ठरत आहे. या सिनेमानं पहिल्याच वीकेंडला तब्बल 3.91 कोटींची कमाई केली आहे. क्रांतिज्योतीचे विद्यार्थी बॉक्स ऑफिसच्या परिक्षेत अव्वल ठरले आहेत. सिनेमाचं बजेट 2 कोटी इतकं होतं. पहिल्याच आठवड्यात सिनेमा 3 कोटीहून अधिक कमाई केली आहे.
advertisement
प्रेक्षकांकडून दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून. सिनेमाच्या यशाविषयी बोलताना हेमंत म्हणाला, "प्रेक्षकांचे प्रेम पाहून मी अक्षरशः भारावून गेलो आहे. आमच्या प्रत्येक सिनेमावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे मात्र यावेळी विषय वेगळा होता. एक संवेदनशील विषय प्रेक्षकांसमोर मांडला व त्यांनी तो मनापासून स्वीकारला, याचे खूप समाधान वाटते."
advertisement










