कोण आहे क्रिती सेनॉनचा होणारा भावोजी, ज्याची पाकिस्तानी गायकाशी होते तुलना? आलिशान घराची किंमत ऐकून शॉक व्हाल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Nupur Sanon boyfriend Stebin Ben: अभिनेत्री क्रिती सेनॉनची धाकटी बहीण नूपुर सेनॉन आणि लोकप्रिय गायक स्टेबिन बेन लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
advertisement
advertisement
नूपुर आणि स्टेबिनच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या खास क्षणी मोठी बहीण क्रिती सेनॉन तिथे उपस्थित होती, तर नूपुरचे आई-वडील व्हिडिओ कॉलद्वारे या सोहळ्यात सहभागी झाले होते. स्टेबिनने अत्यंत रोमँटिक स्टाईलमध्ये नूपुरला प्रपोज केलं आणि आता ११ जानेवारीच्या त्या खास दिवसाची चाहते वाट पाहत आहेत.
advertisement
भोपाळच्या एका ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या स्टेबिनचा आवाज ऐकला की अनेकांना पाकिस्तानचा सुपरस्टार गायक आतिफ अस्लम याची आठवण येते. सुरुवातीला त्याने जुन्या गाण्यांचे कव्हर व्हर्जन गायला सुरुवात केली. 'मेरा दिल भी कितना पागल है' किंवा 'भीगी भीगी रातों में' सारखी गाणी त्याच्या आवाजात घराघरात पोहोचली.
advertisement
advertisement
गंमत म्हणजे, स्टेबिनला कधीच गायक व्हायचं नव्हतं. त्याला पायलट किंवा इंजिनिअर बनायचे स्वप्न होते. त्याने सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवीही पूर्ण केली आहे. पण नशिबाचे चक्र फिरले आणि २०१७ मध्ये 'कैसी ये यारियां' या वेब सीरिजमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. २०२१ मध्ये सिद्धार्थ मल्होत्राच्या 'थोडा थोडा प्यार' या गाण्याने त्याला बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळवून दिली.
advertisement
स्टेबिनचं वर्तुळ केवळ संगीत क्षेत्रापुरतं मर्यादित नाही. तो भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार एम.एस. धोनीचा जवळचा मित्र आहे. धोनीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्येही तो अनेकदा दिसला आहे. इतकंच नाही, तर ऋषभ पंतच्या बहिणीच्या संगीत सोहळ्यात आणि चक्क अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यातही त्याने आपल्या आवाजाची जादू दाखवली होती.
advertisement
स्टेबिनच्या एकूण संपत्तीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसली, तरीही अनेकदा त्याच्या लाइफस्टाइलवरून त्याच्या श्रीमंतीचा अंदाज येतो. काही काळापूर्वीच त्याने मुंबईत ६.६७ कोटींचं ड्युप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केलं होतं. त्याचं म्युझिक करिअर, त्याची रिलीज झालेली गाणी, लाइव्ह शो आणि एन्डोर्समेंट हे त्याच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत.










