Mrunal Dusanis: 'दिसते साधी पण मी खूप...', शांत, सरळ दिसणारी मृणाल दुसानीस खऱ्या आयुष्यात कशी?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Mrunal Dusanis: मराठी छोट्या पडद्यावर गोड, शांत, सरळ स्वभावाची भूमिका साकारणारी अभिनेत्री मृणाल दुसानीस खऱ्या आयुष्यात मात्र थोडीशी वेगळी आहे. चार वर्षांच्या ब्रेकनंतर पुनरागमन करणाऱ्या मृणालने तिच्या खऱ्या स्वभाविषयी सांगितलं आहे.
advertisement
‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतील कावेरीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली मृणाल ही प्रेक्षकांच्या मनात आजही कायम आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वामध्ये एक गोडसर साधेपणा आहे. पण अलीकडे दिलेल्या मुलाखतीत मृणालने कबूल केलं – “मी तापट स्वभावाची आहे, मला पटकन राग येतो.” हे ऐकून अनेक चाहते थक्क झाले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









