Gautami Patil: 'नको नको ते लोकही...' बिग बॉस मराठीसाठी गौतमी पाटीलचा स्पष्ट नकार, समोर आलं मोठं कारण
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Gautami Patil on Rejecting Bigg Boss Marathi: गौतमीच्या जबरदस्त फॅन फॉलोईंगमुळे, जर तिने 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेतली, तर शोचा टीआरपी रेकॉर्डब्रेक होईल, असे मानले जात आहे.
advertisement
advertisement
गौतमी पाटील म्हणजे तरुणाईच्या ओठावरचे एक नाव! तिचा डान्स, तिच्या हटके अदा आणि साधेपणा लोकांना तिच्या प्रेमात पाडतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत, महिला वर्गामध्येही तिची जबरदस्त क्रेझ आहे. त्यामुळे ती 'बिग बॉस मराठी ६' मध्ये दिसणार, अशा चर्चांना उधाण आले होते. मागील काही दिवसांपासून ही चर्चा असली तरी, आता यामागचे सत्य समोर आले आहे.
advertisement
advertisement
advertisement
गौतमी म्हणाली, "बिग बॉस खूप छान आहे. इथे गेल्यावर लोकांचं करिअर होतंच. पण हा शो नाकारण्याचं कारण वेगळं आहे. पण मी माझ्या आईपासून इतके दिवस दूर राहू शकत नाही. कामाच्या निमित्ताने मी तीन-चार दिवस आईपासून लांब राहू शकते, पण त्याहून जास्त दिवस नाही! पण बिग बॉस खरंच बेस्ट आहे आणि तिथे गेल्यावर नाही नाही ते आपल्याला ओळखतात."
advertisement
advertisement








