8 एपिसोडची क्राइम-ड्रामा सीरिज, अजिबात मिस करू नका क्लायमॅक्स; या वीकेंडला OTT वर पाहाच
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Must Watched Series on OTT : ओटीटीवरील एक आठ एपिसोडची जबरदस्त सीरिज खरोखर मस्ट वॉच आहे. क्लायमॅक्स तर अजिबात मिस केला नाही पाहिजे.
ओटीटीवर अनेक चित्रपट आणि सीरिज रिलीज होत असतात. रोमान्स, सस्पेन्स, हॉरर, क्राइम, ड्रामा असणाऱ्या या सीरिज आणि फिल्म प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करतात. ओटीटीवरील एक क्राइम ड्रामा मात्र सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ओटीटीवरील आठ एपिसोडची ही सीरिज एकदा पाहायला घेतली की शेवटपर्यंत पाहतच राहाल. त्यामुळे या वीकेंडला ही सीरिज अजिबात मिस करू नका.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ओटीटीवरील ही सीरिज याच वर्षी रिलीज झाली आहे. ली जियोंग-रिम यांनी या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर या सीरिजची कथा किम ह्यो-जेओंग यांनी लिहिली आहे. हिदेओ ओकुडा या जपानी लेखकांच्या 'नाओमी और कनाको' या कादंबरीवर आधारित या सीरिजची कथा आहे. As You Stood By असं या सीरिजचं नाव आहे. या सीरिजमध्ये सस्पेन्स आणि विकास दोन्ही दाखवण्यात आलं आहे. ही एक साऊथ कोरियन क्राइम-थ्रिलर वेब सीरिज आहे. 7 नोव्हेंबरला ही सीरिज ओटीटीवर रिलीज झाली आहे.
advertisement
As You Stood By या सीरिजमध्ये जियोन सो-नी, ली यू-मील, जांग सेउंग-जो आणि ली मू-सेंग सारखे कलाकार झळकत आहेत. सर्वच कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. या सीरिजमध्ये दोन बालमैत्रीणींची गोष्ट दाखवली आहे. ज्या घरगुती हिंसाचाराला बळी पडतात. पुढे मित्राच्या मदतीने त्या आपल्या पतीची हत्या करतात. पुढे अचानक एका अनोळखी व्यक्तीची सीरिजमध्ये एन्ट्री होते.
advertisement


