गिरिजा ओकच्या सौंदर्याला भुललात? मराठीतील 'या' अभिनेत्रीही काही कमी नाही... एकीने तर दुबईत थाटला संसार

Last Updated:
Girija Oak Trending on Social Media : मराठी विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करतात. आज आपण मराठी सिनेसृष्टीत पॉप्यूलर असलेल्या काही अभिनेत्रींच्या सौंदर्यावर नजर टाकूया.
1/8
संपूर्ण देशभरात सोशल मीडियावर फक्त एकाच अभिनेत्रीचं नाव ट्रेंडिंग आहे, ती म्हणजे गिरिजा ओक. एका मुलाखतीतील तिचा लूक व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र तिचीच चर्चा आहे. मराठी प्रेक्षक गेली कित्येक वर्ष गिरिजाला ओळखत आहे.

advertisement
2/8
पण आता गिरिजा फक्त मराठी विश्वापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. गिरिजाने देशभरातल्या प्रेक्षकांना तिच्या सौंदर्याने आणि साधेपणाने भुरळ पाडली आहे. वयाच्या १५ व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या गिरिजाने आजवर मराठीसह अनेक हिंदी आणि कन्नड सिनेमा आणि वेबसीरिजमध्ये काम केलं आहे.

3/8
मात्र, मराठी विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करतात. आज आपण मराठी सिनेसृष्टीत पॉप्यूलर असलेल्या काही अभिनेत्रींच्या सौंदर्यावर नजर टाकूया.

4/8
या लिस्टमध्ये पहिलं नाव येतं, ते म्हणजे सई ताम्हणकर. सईने मराठी पाठोपाठ हिंदी मनोरंजन विश्वात महत्त्वाची कामगिरी केली आहे. फक्त वेबसीरिज नाही, तर समीक्षकांनी कौतुक केलेल्या चित्रपटांमध्ये तिने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. आपल्या ग्लॅमरसाठी प्रसिद्ध असलेल्या सईने, तिच्या अभिनयातूनही एक वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे.

5/8
प्रिया बापट हे नाव आता कोणासाठीही नवीन राहिलेलं नाही. आपल्या क्यूट आणि बबली स्वभावाने तिने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. मराठीमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर प्रियाने हिंदी वेबसीरिजमधून तिचं नाव देशातील घराघरात पोहोचवलं आहे.

6/8
सोनाली कुलकर्णी ही मराठीमधील सर्वांत सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. नटरंग, धुरळा, हिरकणी यांसारख्या चित्रपटांमधून सोनालीने तिच्या अभिनयाचं कौशल्य सिद्ध केलं आहे. इतकंच नाही, तर सई, प्रियाबरोबरच सोनाली कुलकर्णी ही मराठीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

7/8
श्रुती मराठेने अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं असून आता ती मालिकांच्या निर्मिती क्षेत्रातही मोलाचं योगदान देत आहे. तिचे सौंदर्य आणि सोज्वळपणा चाहत्यांना नेहमीच आकर्षित करतो.

8/8
प्राजक्ता माळी हे आता महाराष्ट्रातील घराघरातील नाव झाले आहे. जुळून येती रेशिमगाठी या मालिकेतून सुरू झालेला तिचा प्रवास अविरतपणे चालला आहे. एकेकाळी अभिनेत्री अशी ओळख असलेली प्राजक्ता आता तिच्या अभिनयासह तिची निर्मिती आणि तिच्या व्यवसायासाठीही ओळखली जाते.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement