नवी मुंबई विमानतळापर्यंत जाण्याचा प्रवास होणार सुखकर, 4 पदरी पूल बांधणार; असा आहे प्लान?

Last Updated:

पनवेल शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय काढण्यासाठी आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी नवीन पूल बांधण्यात येणार आहे.

नवी मुंबई विमानतळापर्यंत जाण्याचा प्रवास होणार सुखकर, 4 पदरी पूल बांधणार; असा आहे प्लान?
नवी मुंबई विमानतळापर्यंत जाण्याचा प्रवास होणार सुखकर, 4 पदरी पूल बांधणार; असा आहे प्लान?
पनवेल शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय काढण्यासाठी आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी नवीन पूल बांधण्यात येणार आहे. पनवेल महानगरपालिकेने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी करंजाडे सांडपाणी पंपिंग स्टेशनजवळ गाढी नदीवर नवीन पूल बांधण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी पनवेल, करंजाडे आणि वडघरच्या सिडको वसाहतींमध्ये राहणाऱ्या प्रवाशांना होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर त्यांनी प्रकाश टाकला. त्यानंतर महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी या योजनेला मंजुरी दिली.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते, करंजाडेकडे जाणाऱ्या सध्याच्या पुलावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. अनेकदा तासनतास वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटत नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे वाहतुकीचे प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा असल्याने, पनवेल- करंजाडे मार्गावर हा एक नवीन पूल बांधण्यात येत आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडण्यासाठी नवीन पूल महत्त्वाचा दुवा ठरणार असल्याचा महापालिकेला विश्वास आहे. 48.40 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाला सर्वसाधारण सभेत प्रशासकीय मान्यता मिळाली. लवकरच पुलाच्या बांधकामाला सुरूवात होण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
मंजूर आराखड्यानुसार, हा पूल चार पदरी असेल, त्याची लांबी 240 मीटर आणि रुंदी 21.5 मीटर असेल. हा पूल पनवेल महानगरपालिकेच्या पूर्वेकडील 40 फूट रुंदीच्या रस्त्याला पश्चिमेकडील करंजाडे नोडकडे जाणाऱ्या सिडकोच्या 20 मीटर रुंदीच्या रस्त्याशी जोडेल. या जोडणीमुळे वाहतूक लक्षणीयरीत्या सुरळीत होईल आणि भविष्यातील वाहनांच्या वाढीला चालना मिळेल,” असे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे म्हणाले. या प्रकल्पासाठी सिडको, जलसंपदा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्रे (एनओसी) मागवली जातील. आयआयटी मुंबई किंवा व्हीजेटीआय मुंबईकडून संकल्पनात्मक डिझाइनची तांत्रिक समीक्षा आणि मंजुरी घेतली जाईल, असे शहर अभियंता संजय काटेकर यांनी पुष्टी केली.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
नवी मुंबई विमानतळापर्यंत जाण्याचा प्रवास होणार सुखकर, 4 पदरी पूल बांधणार; असा आहे प्लान?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement